Aurangabad | मराठवाड्यातील 45 महाविद्यालयांवर धोक्याची घंटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून नो ग्रेडची शिक्षा!

Aurangabad | मराठवाड्यातील 45 महाविद्यालयांवर धोक्याची घंटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून नो ग्रेडची शिक्षा!
डॉय बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

सदर महाविद्यालयांना यापूर्वी संधी देण्यात आली होती तरीही 45 महाविद्यालय नो ग्रेडमध्ये आहेत. त्यांना अजून एक संधी देण्यात येईल. त्यात त्यांनी राहिलेल्या बाबी पूर्ण न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

May 25, 2022 | 11:34 AM

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University ) प्रशासनाने 45 महाविद्यालयांना ‘नो ग्रेड’ दिल्याने त्यांची संलग्नीकरण रद्द होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ प्रशासनातर्फे (University Administration) महाविद्यालयांचा शैक्षणिक (Educational) आणि प्रशासकीय दर्जा वाढवण्यासाठी शैक्षणिक मूल्यांकनाची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत 229 महाविद्यालयांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. यातील 45 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पुरेशा शैक्षणिक सुविधा नसल्याने त्यांना नो ग्रेड मिळाला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन त्यांचे संलग्नीकरण रद्द करण्याची शक्यता आहे.

229 कॉलेजचे मूल्यांकन पूर्ण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजची संख्या 480 आहे. यापैकी 401 कॉलेजचे मूल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव आले होते. आतापर्यंत 229 कॉलेजचे मूल्यांकन पूर्ण झाले असू 172 ची प्रक्रिया सुरु आहे. सुविधांच्या आधारी ए, बी, सी, डी आणि नो ग्रेड देण्यात आले आहेत. यातील 39 कॉलेजला ए, 35 कॉलेजला बी, 34 कॉलेजला सी ग्रेड तर 68 कॉलेजला डी ग्रेड देण्यात आला आहे.

सुधारण्याची संधी देणार

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 नुसार अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांचा शैक्षणिक व प्रशासकीय दर्जा ठरवणे, संलग्नीकरणाचे नूतनीकरण करण्यासाठी मूल्यांकन बंधनकारक असते. विद्यापीठाने प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत एकूण कर्मचारी, इमारत, ग्रंथालय, प्रयोगशाळा, मैदान, भौतिक सुविधांची तपासणी केली जाते. महाविद्यालयांना संधी देण्यात आली होती तरीही 45 महाविद्यालय नो ग्रेडमध्ये आहेत. त्यांना अजून एक संधी देण्यात येईल. त्यात त्यांनी राहिलेल्या बाबी पूर्ण न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें