औरंगाबाद : कन्नडमध्ये शिवजयंतीची मिरवणूक अडवली, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची पोलिसांशी खडाजंगी

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि पोलीस यांच्यात काही काळ वाद झाला. सुमारे अर्धा तास हे वाद सुरु होते. यामुळे काही काळ वाहतूकदेखील ठप्प झाली. अखेर हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस महासंचालकांचे पत्र दाखवल्यानंतर ही मिरवणूक पुन्हा सुरु झाली.

औरंगाबाद : कन्नडमध्ये शिवजयंतीची मिरवणूक अडवली, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची पोलिसांशी खडाजंगी
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 12:29 PM

औरंगाबादः यंदाची शिवजयंती औरंगाबाद (Aurangabad Shiv Jayanti) जिल्ह्यासाठी खास आहे. कारण या मुहूर्तावर औरंगाबाद शहरात देशातील सर्वोच्च असा शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या वैभवात छत्रपती शिवरायांच्या या भव्य पुतळ्यामुळे मोलाची भर पडली आहे. त्यामुळे 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या शिवजयंतीचा उत्साह शहरात आणि जिल्ह्यात अवर्णनीय होता. औरंगाबादमधील ग्रामीण भागातही विविध ठिकाणी राजकीय नेत्यांनी शिवरायांचा जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा केला. कन्नडमध्येही (Kannad) माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी शिवजयंती निमित्त मिरवणूक काढली होती. मात्र मिरवणुकीला परवानगीच नाही, असे सांगत पोलिसांनी ती अडवली. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

पोलीस अर्धा तास खडाजंगी

छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात कन्नडमध्ये काल रात्री मिरवणूक निघाली. मात्र अनेक ठिकाणी मिरवणुकीला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी यावर कारवाई केली. कन्नडमध्येही पोलिसांनी ही मिरवणूक रोखली. त्यामुळे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि पोलीस यांच्यात काही काळ वाद झाला. सुमारे अर्धा तास हे वाद सुरु होते. यामुळे काही काळ वाहतूकदेखील ठप्प झाली. अखेर हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस महासंचालकांचे पत्र दाखवल्यानंतर ही मिरवणूक पुन्हा सुरु झाली.

कोण आहेत हर्षवर्धन जाधव?

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर हे हर्षवर्धन जाधव यांचं मूळ गाव. त्यांचे वडील रायभान जाधव हे जवळपास साडे बारा वर्ष कन्नडचे आमदार होते. 1997 ला त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या पत्नीनी अडीच वर्षे आमदारकी पाहिली. त्यानंतर कन्नड मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं. 1999 मध्ये पिशोर जिल्हा परिषद सर्कलमधून हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढवली. जिंकली. तसेच कन्नड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही निवडून आले. 2009 मध्ये त्यांनी मनसेत प्रवेश केला. तेव्हापासून 2019 पर्यंत ते कन्नडचे आमदार राहिले. 2014 ची निवडणूक ते शिवसेनेकडून लढले होते.

इतर बातम्या- 

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 20 February 2022

गुलाबरावांनी ‘डाकू’ म्हणताच नाथाभाऊंनी ‘चोर’ म्हणत काढले उट्टे; शिवसेना-राष्ट्रवादीत शिव्यांची लाखोली

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.