AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad VIDEO | संसार उघड्यावर, घरांचे ढिगार, औरंगाबादची लेबर कॉलनी जमीनदोस्त, रहिवाशांच्या डोळ्यात अश्रू अन् आव्हानं…

घरांचे ढिगारे झाले तसे रहिवाशांसमोर अडचणींचा डोंगर आहेत. या प्रश्नावर आता स्थानिक प्रशासन काय मार्ग काढते याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Aurangabad VIDEO | संसार उघड्यावर, घरांचे ढिगार, औरंगाबादची लेबर कॉलनी जमीनदोस्त, रहिवाशांच्या डोळ्यात अश्रू अन् आव्हानं...
लेबर कॉलनीवासियांना अश्रू अनावर Image Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 11, 2022 | 11:32 AM
Share

औरंगाबादः 60 पेक्षा जास्त वर्षांपासून ज्या घरांनी भक्कमपणे साथ दिली.. लहान पोरं, बापाच्या वयात गेली, बाप आजोबाच्या भूमिकेत गेले, लेकी सुना झाल्या, आजीच्या वयातही गेल्या.. माणसं मोठी झाली. डोक्यावरचं छत कधी उडूनही जाऊ शकतं, ही कल्पनाही कधी मनाला शिवली नाही. पण अचानक घरांचा ताबा आता सोडावा लागणार, या बातमीनं काही वर्षांपूर्वी लेबर कॉलनीवासियांना (Labor colony) धक्का बसला. 1953च्या दशकात बांधलेल्या लेबर कॉलनीतील अनेक घरातील शासकीय कर्मचारी (Government employee) निवृत्तीनंतरही येथेच राहत आहेत. काहींनी इतरांना घरे विकली. काहींनी पोटभाडेकरू ठेवले. मात्र ही जागा जिल्हा प्रशासनाच्या (Aurangabad district) मालकीची असून ती सोडावी लागणार हे ऐकून रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रशासनाविरोधात लढा सुरु झाला. कोर्टकचेऱ्या झाल्या. अनेकांनी कोर्टाच्या खेट्या घातल्या. पण शासकीय नियमानुसार, ही जागा जिल्हा प्रशासनाची असल्याचं अनेकदा सिद्ध झालं अन् रहिवाशांना घरं सोडण्याचे आदेश देण्यात आले. घरं सोडण्यासाठी अनेकदा मुदतही देण्यात आली. पण ही घरं म्हणजे केवळ उभ्या भिंती थोडी होत्या, उभं आयुष्य ज्यानं डोक्यावर छत दिलं तो आसरा होता. उन्हा-पावसापासून संरक्षण देणारी, अनेकांच्या आय़ुष्यातील चढ-उतार, सुख-दुःख पाहिलेली ही घरकुलं होती. प्रशासनाच्या सूचना आल्यानंतर अनेकांनी दुःखाचा आवंढा गिळत सामानाची बांधाबांध सुरु केली. काहींनी बाहेरचा रस्ता धरला. पण काहीतरी चमत्कार होईल अन् आपली घरं वाचतील, आपल्याला इथेच राहण्याची परवानगी मिळेल, या भाबड्या आशेवर राहिलेली काही मंडळी. आज 11 मे 2022 रोजी जिल्हा प्रशासनातर्फे येथील जीर्ण घरांवर बुलडोझर चालवण्याची कारवाई सुरु झाली अन् क्षणार्धात उभ्या घरांचे ढिगारे बनले. आशेला लागलेल्या माय माऊलींसह त्यांचे संसार बेघर झाले.

रहिवाशांना अश्रू अनावर…

घरातलं सिलिंडर, पाण्याची, स्वयंपाकाची भांडी रस्त्यावर येऊन पडली, कपड्यांसहित कपाटं उघड्यावर आली. डोळ्यादेखत संसाराची ही अवस्था पाहून रहिवाशांना अश्रू अनावर झाले. हे दुःख कथन करताना एक महिला म्हणाली, 50 वर्षांपासून संसार केला. आशा लावून बसलो होतो. सरकारनं कारवाई करताना आमचं काय होईल, एवढापण विचार केला नाही…. कलेक्टर, मंत्री, खासदारांना बोललो, पण सगळेच आमच्या मागे हात धुऊन लागले आहेत… आई रडत होती अन् मागे उभी होती, दोन चिमुरडी पोरं.. घरावर काय आभाळ कोसळलंय, याची कल्पना कदाचित या वयात त्यांना नसावी. पण महिलेच्या डोळ्यातले अश्रू आणि पुढील आव्हानं स्पष्ट दिसत होती.

उभ्या घरांच्या भिंती ढिगाऱ्यात बदलल्या

लेबर कॉलनीतील घरांवरील पाडापाडीची कारवाई जवळपास पूर्ण झाली आहे. घरातील सामान उघड्यावर पडलेल्या नागरिकांसमोर आता कुठे जावे, हा प्रश्न आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी रहिवासी करत आहेत. तुटपुंज्या पगारात भाड्याच्या घरात राहणं कसं शक्य आहे, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. घरांचे ढिगारे झाले तसे रहिवाशांसमोर अडचणींचा डोंगर आहेत. या प्रश्नावर आता स्थानिक प्रशासन काय मार्ग काढते याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Follow Us
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?