AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | महापालिकेत हंगामा VIDEO ! पाणी प्रश्नावरून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर आयुक्त भडकले, पोलिसात तक्रार दाखल

दोन तरुणांनी महापालिकेत येऊन अशा प्रकारे हंगामा केल्याने महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सराकारी कामात अडथळा आणल्यामुळे निषेध व्यक्त केला. सर्व कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर कामबंद आंदोलन केलं.

Aurangabad | महापालिकेत हंगामा VIDEO ! पाणी प्रश्नावरून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर आयुक्त भडकले, पोलिसात तक्रार दाखल
Image Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 13, 2022 | 5:44 PM
Share

औरंगाबादः शहरातला पाणी प्रश्न (Water issue) तापला असताना महापालिकेत आज हंगामा पहायला मिळाला. हातात कागदी फलक घेऊन महापालिकेत (Municipal corporation) आलेल्या दोघांनी थेट मनपा आयुक्तांना गाठलं. पाणी प्रश्नावर आक्रमक झालेले हे दोघे मनपा आयुक्तांसमोर आरेरावी करू लागले.  मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकले नाहीत. या आरडा-ओरडीचं चित्रीकरणही करु लागलेल्या तरुणांवर अखेर आयुक्त भडकले. या घटनेमुळे महापालिकेत चांगलंच तणावाचं वातावरण निर्माण झालं. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, महापालिका आय़ुक्तांवर अशा प्रकारे हल्ला करण्याच्या घटनेचा कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करत कामबंद आंदोलन केलं.

मनपात गोंधळ

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, राहुल इंगळे आणि त्याचा साथीदार योगेश हरिशचंद्र मगरे अशी गोंधळ घालणाऱ्या तरुणांची नावं आबेत. आज दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय हे महापालिकेतून बाहेर पडत होते. कार्यालयातलं काम आटोपून ते दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडत असतानाच एकाने कागदी फलक घेऊन आयुक्तांकडे जाण्याचा प्रयत्न केला. पांडेय यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात सोबत असलेल्या दुसऱ्याने या घटनेचं चित्रीकरण सुरु केलं. ही स्टंटबाजी पाहून आय़ुक्त चांगलेच भडकले. सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत तरुणांना समज दिली. तरीही ते ऐकले नाहीत. आयुक्तांना जाऊन भिडले. सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखल्याने या प्रकारात आस्तिक कुमार पांडेय बचावले.

तरुणांविरोधात तक्रार दाखल

दरम्यान, राहुल इंगळे आणि त्याचा साथीदार योगेश हरिशचंद्र मगरे यांच्याविरोधात ह्लला करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, विना परवाना शासकीय कार्यालयात छायाचित्रीकरण करणे, शासकीय कार्यालयाची शांतता भंग करणे आदी बाबींसाठी सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हल्लेखोरांचा निषेध, कर्मचाऱ्यांचे कामबंद

दोन तरुणांनी महापालिकेत येऊन अशा प्रकारे हंगामा केल्याने महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सराकारी कामात अडथळा आणल्यामुळे निषेध व्यक्त केला. सर्व कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर कामबंद आंदोलन केलं.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा