VIDEO | औरंगाबादेत करंजखेडा बाजार समितीत राडा, गुंड व्यापाऱ्यांची आरेरावी, शेतकऱ्याला जास्त भाव दिल्यानं मारहाण!

| Updated on: Mar 15, 2022 | 9:40 AM

करंजखेडा बाजारसमितीत घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मारहाण प्रकरणी पिशोल पोलीस ठाण्यात आरोपी हर्षवर्धन निकम आणि दत्तू गवारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO | औरंगाबादेत करंजखेडा बाजार समितीत राडा, गुंड व्यापाऱ्यांची आरेरावी, शेतकऱ्याला जास्त भाव दिल्यानं मारहाण!
करंजखेडा बाजार समितीत व्यापाऱ्याला मारहाण
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबादः शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव का देतो, असं म्हणत एका व्यापाऱ्याला गुंड व्यापाऱ्यांनी बेदम मारहाण (Trader beaten up) केल्याची घटना औरंगाबादेत घडली. औरंगाबाद जिल्ह्यातील करंजखेडा बाजार समितीत (Karanjkheda Market commitee) हा प्रकार घडला. एका व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा माल घेताना त्याला चांगला त्याला चांगला भाव दिला. मात्र यामुळे संतापलेल्या दुसऱ्या व्यापाऱ्याने त्याला जाब विचारला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याची बाजू घेणाऱ्या व्यापाऱ्याला बेदम मारहाण (Aurangabad fighting) केली. मारहाणीचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. कसाबसा हा वाद शांत करण्यात आला. मात्र बाजारसमिती परिसरात या प्रकारामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली.

मारहाण करणारे आरोपी कोण?

करंजखेडा बाजारसमितीत व्यापाऱ्याला बेदम मारहाण करणाऱ्या या गुंड व्यापाऱ्यांची नावं हर्षवर्धन निकम आणि दत्तू गवारे अशी आहेत. साहिल चुडीवाला या व्यापाऱ्याच्या दुकानात घडलेला हा प्रकार आहे. निकम आणि गवारे या आरोपींनी साहिल चुडीवाला यांच्या दुकानात घुसून त्याला अशा प्रकारे बेदम मारहाण केली. या घटनेत साहिल चुडीवाला हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बाजार समितीत दहशतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, करंजखेडा बाजारसमितीत घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मारहाण प्रकरणी पिशोल पोलीस ठाण्यात आरोपी हर्षवर्धन निकम आणि दत्तू गवारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, अशीदेखील माहिती हाती आली आहे.

इतर बातम्या-

औरंगाबात इलेक्ट्रॉनिक थ्री व्हिलरचे प्रदर्शन, मिशन फॉर ग्रीन मोबिलिटी अभियानाला वेग, चार्जिंग स्टेशनलाही प्रोत्साहन देणार

औरंगाबादः जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत ICU, काम प्रगतीपथावर, काय असतील सुविधा?