AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad crime: आयपीएलवर सट्टा लावणारे पोलिसांच्या हाती, मोबाइल, जुगाराचे साहित्य अन् 89,300 रोख जप्त

औरंगाबाद: सध्या सुरु असलेल्या ड्रीम इलेव्हन आयपीएल 20-20 अर्थात इंडियन प्रीमिर लीग (IPL 20-20) क्रिकेट मॅचवर मोबाइल ऑनलाइन अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून सट्टा लावणारे सहा जण औरंगाबाद पोलिसांच्या (Aurangabad police) हाती लागले. शहरातील सिटी चौक पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोबाइल आणि 89,300 रुपये रोख जप्त औरंगाबाद करण्यात […]

Aurangabad crime: आयपीएलवर सट्टा लावणारे पोलिसांच्या हाती, मोबाइल, जुगाराचे साहित्य अन् 89,300 रोख जप्त
आयपीएलवर सट्टा लावणारे सहा जण औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात.
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 7:51 PM
Share

औरंगाबाद: सध्या सुरु असलेल्या ड्रीम इलेव्हन आयपीएल 20-20 अर्थात इंडियन प्रीमिर लीग (IPL 20-20) क्रिकेट मॅचवर मोबाइल ऑनलाइन अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून सट्टा लावणारे सहा जण औरंगाबाद पोलिसांच्या (Aurangabad police) हाती लागले. शहरातील सिटी चौक पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोबाइल आणि 89,300 रुपये रोख जप्त औरंगाबाद करण्यात आले.

क्रिकेट मॅचवर लावत होते सट्टा

सिटी चौक पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद यांना गुप्त बातमीरामार्फत या परिसरात काहीजण क्रिकेटवर सट्टा लावत असल्याची माहिती मिळाली. पोस्ट ऑफिससमोरील जुनाबाजार मेमन इंटरप्राइज येथील किराणा दुकानासमोर हा जुगाराचा खेळ सुरु असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. आयपीएल ट्वेंटी-ट्वेंटी मधील क्रिकेट मॅचवर मोबाइल ऑनलाइन अ‍ॅप्लीकेशनद्वारे सट्टा घेऊन लोकांना जुगार खेळण्यात प्रोत्साहित केले जात होते. तसेच पैशांवर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. सय्यद यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना दिली.

बुधवारी रात्री पोलिसांचा छापा

पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार, संबंधीत जागेवर जाऊन छापा टाकला. बुधवारी म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी रात्री 9.25 वाजता जुनाबाजार औरंगाबाद येथे पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत महमंद यासेर महंमद याकुब, शेख आसेफ शेख रहीम यांना जुना बाजार येथून ताब्यात घेतले. तर मध्यरात्री 12 वाजेनंतर सातारा परिसरातील आयबीआय बिल्डिंगमधील फ्लॅटमधून तरबेज खान करीम खान, शेख अली उर्फ अलीम पिता शेख महेमूद, मनोज हिरालाल परदेशी आणि शेख मतीन शेख महेमूद यांना ताब्यात घेण्यात आले.

टॉस, सेशन, विन मॅच या कोडद्वारे सुरू होती बेटिंग

पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता साथीदार आरोपी जुबेर शहा- भोकरदन यांच्या सांगण्यावरून हे सहा जण विना परवाना अवैधरित्या मोबाइलवर लोकांकडून पैसे घेत सट्टा लावत असल्याचे उघड झाले. सध्या सुरु असलेल्या आयपीएलवर लोकांकडून मॅचवर टॉस, सेशन, विन मॅच या कोडद्वारे बेटिंग घेऊन पैशांवर सट्टा लावून लोकांना प्रोत्साहित करत होते.

वेगवेगळ्या फोन पे अकाउंट नंबरचा वापर

या सट्ट्यातून मिळणाऱ्या पैशांचे व्यवहार आरोपींच्या फोन पे अकाउंटवरून करण्यात येत होते. यासाठी वेगवेगळ्या फोन पे अकाउंटचाही वापर केला जात होता. या सहा जणांकडून पोलिसांनी मोबाइल, इतर साहित्य आणि 89,300 रुपये रोख जप्त केले आहेत.

इतर बातम्या-

Aurangabad: 1 ऑक्टोबरपासून बिलावर हवा परवाना क्रमांक, खाद्यपदार्थ विकत घेताना बाळगा सावधगिरी

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.