Aurangabad: 1 ऑक्टोबरपासून बिलावर हवा परवाना क्रमांक, खाद्यपदार्थ विकत घेताना बाळगा सावधगिरी

औरंगाबाद: नवरात्र आणि दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात (Festival season in Aurangabad) बाजारपेठांमध्ये मोठी लगबग सुरु आहे. मात्र सणासुदीत खाद्य पदार्थ विक्रीत काही गैर प्रकार होऊ नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनानेही (Food and Drug Administration) आपले नियम अधिक कठोर केले आहेत. मिठाई आणि खाद्यतेलासह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. 1 […]

Aurangabad:  1 ऑक्टोबरपासून बिलावर हवा परवाना क्रमांक, खाद्यपदार्थ विकत घेताना बाळगा सावधगिरी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Sep 30, 2021 | 4:16 PM

औरंगाबाद: नवरात्र आणि दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात (Festival season in Aurangabad) बाजारपेठांमध्ये मोठी लगबग सुरु आहे. मात्र सणासुदीत खाद्य पदार्थ विक्रीत काही गैर प्रकार होऊ नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनानेही (Food and Drug Administration) आपले नियम अधिक कठोर केले आहेत. मिठाई आणि खाद्यतेलासह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. 1 ऑक्टोबरपासून ग्राहकांना एफडीने दिलेल्या परवाना क्रमांकासह बिले द्यावी लागणार आहेत. तसेच विनापरवाना खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रकाशसनाचे सहआयुक्त यू.एस. वंजारी यांनी दिला आहे.

बिलावर परवाना नंबर टाकणे सक्तीचे

अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी शहरातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक घेतेली. यात मठाई उत्पादक, विक्रेते, खाद्यतेल उत्पादक, विक्रेते, अन्य खाद्यपदार्थ व्यावसायिक, हॉटेल मालकांचा समावेश होता. या बैठकीत बोलताना यू.एस. वंजारी यांनी सांगितले की, खाद्यपदार्थ विक्रीच्या बिलावर अन्न व प्रशासनाने दिलेला परवाना नंबर टाकणे सक्तीचे आहे. बिलावर परवाना नसेल संबंधित विक्रेता किंवा उत्पादकावर कारवाई करण्यात येईल.

1 ते 7 ऑक्टोबरदरम्यान विशेष परवाना मोहीम

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने खाद्यपदार्थ विक्रेते व उत्पादकांसाठी विशेष परवाना/नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यात उत्पादक व विक्रेत्यांनी परवाना काढून घ्यावा, असे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीत सहाय्यक आयुक्त (अन्न). अ.अ. मैत्रे, अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर, संजय घट्टे, वर्षा रोडे यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले.

ग्राहकांनीही सजग झाले पाहिजे

शहरात काही ठराविक आणि मानांकित खाद्यपदार्थ उत्पादक आणि विक्रेते सोडले तर असंख्य व्यापारी विना बिलाचा व्यवसाय करीत आहेत. मिठाई विकत घेतल्यावर अनेक ग्राहक बिल मागत नाहीत. इथेच व्यापाऱ्यांचे फावते. त्यामुळे ग्राहकांनीही जागरूक होऊन आता खाद्यपदार्थ खरेदीचे बिल मागावे. कारण यामुळे जीएसटी व आयकर बुडवेगिरी थांबत. तसेच राज्याचा व केंद्र सरकारचा महसूलदेखील वाढेल.

खाद्यपदार्थावर एक्सपायरी डेट पहावी

अनेक मिठाईच्या दुकानांमध्ये खुली मिठाई ठेवलेली असते. या मिठाईवरदेखील आता एक्सपायरी डेट म्हणजेच ही मिठाई कधीपर्यंत खाण्यास उपयुक्त आहे, ती तारीख लिहिणे व्यापाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे ग्राहकांनीही मिठाईवर अशी तारीख लिहिलेली नसेल तेव्हा संबंधित व्यापाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, तसेच अशी मिठाई घेणे टाळले पाहिजे, अशा सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिल्या.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें