AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad VIDEO | औरंगाबादेत फाजलपूरा भागात तुफान राडा, मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात वाद, दगडफेक

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून नशेखोरीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. नागरिक तसेच राजकीय नेत्यांनीही याविरोधात पोलिसांनी कठोर पाऊलं उचलावीत, अशी मागणी केली होती. मात्र अद्याप पोलिसांना या प्रकारावर आळा घालण्यात यश आलेलं दिसत नाहीये.

Aurangabad VIDEO | औरंगाबादेत फाजलपूरा भागात तुफान राडा, मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात वाद, दगडफेक
Image Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 04, 2022 | 1:52 PM
Share

औरंगाबादः औरंगाबाद शहरातील वाढलेली गुंडगिरी आणि नशेशोरीवर अंकुश लावण्याची मागणी वारंवार समोर येत आहे. त्यातच खून, मारहाणीच्या घटनांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी मध्यरात्री फाजलपुरा (Fajalpura) भागातही दोन टोळक्यांमध्ये वाद झाले आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत  (Aurangabad Rada)झालं. फाजलपुरा भागात रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. या घटनेचे व्हिडिओ सध्या औरंगाबादमधील सोशल मीडियात (Viral Video) व्हायरल होत आहेत. रात्रीच्या काळोखात काही तरुण हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेले व्हिडिओमध्ये दिसत आहेत. एकजण या सगळ्याचं चित्रीकरण करतेय. हे चित्रीकरण सुरु असताना हॉकीच्या काठ्या हातात घेतलेले तरुण पळून जाताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील दोन्ही गटातील तरुणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशेखोरीतून दगडफेक

सदर घटना शहरातील फाजलपुरा भागात घडली. घटनेत दोन गटांतील तरुणांनी परस्परांवर तुफान दगडफेक केली. त्यानंतर ते हातात काठ्या घेऊन ते एकमेकांना मारण्याच्या तयारीत होते. मात्र काही नागरिकांनी ही माहिती तत्काळ पोलिसांना कळवली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत दोन गटांतील भांडणात हस्तक्षेप केला. त्यामुळे फाजलपुरा भागातील तणाव निवळला.

दंगलीचा गुन्हा दाखल

सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. हाणामारी करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांतर्फे घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारे दंगल घडवणारे तरूण नशेबाज होते. नशेच्या अंमलाखाली त्यांनी हा राडा घातला. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून नशेखोरीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. नागरिक तसेच राजकीय नेत्यांनीही याविरोधात पोलिसांनी कठोर पाऊलं उचलावीत, अशी मागणी केली होती. मात्र अद्याप पोलिसांना या प्रकारावर आळा घालण्यात यश आलेलं दिसत नाहीये. याच नशेबाजीतून शहरातील गुंडगिरीचं प्रमाणही वाढलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?