Aurangabad | तर 35 वर्ष राजकारणात नसतो, राजेश टोपेंच्या आरोपांना संदीपान भुमरेंचं प्रत्युत्तर

शिवसेनेचे मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी करून त्यांना त्रास देत असल्याच्या राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या आरोपांना शिवसेना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan BHumre) यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Aurangabad | तर 35 वर्ष राजकारणात नसतो, राजेश टोपेंच्या आरोपांना संदीपान भुमरेंचं प्रत्युत्तर
राजेश टोपे यांच्या आरोपांना संदीपान भूमरे यांचं प्रत्युत्तरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 5:44 PM

औरंगाबादः शिवसेनेचे मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी करून त्यांना त्रास देत असल्याच्या राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या आरोपांना शिवसेना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan BHumre) यांनी प्रत्युत्तर दिलंय. आपण दादागिरी केली असती तर राजकारणात 35 वर्षे टिकलो नसतो. राजेश टोपे यांचे सगळे आरोप खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादमधील दोन मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली होती. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. यावेळी शिवसेना मंत्री संदीपान भूमरे आणि अब्दुल सत्तार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोडाफोडी करत असल्याचं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं होतं.

राजेश टोपेंचे आरोप काय?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरीही गाव पातळीवर सर्वकाही आलबेल नसल्याची खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली. औरंगाबाद जिल्ह्यासाठी राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री राजेश टोपे यांनीच शिवसेनेचे मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याची तक्रार केली. शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय ह्या ही गोष्टी खऱ्या आहेत, अशी नाराजी टोपेंनी व्यक्त केली. सत्तेच्या बळावर राष्ट्रवादीत फोडाफोडी करू नये. आपण महाविकास आघाडी धर्म पाळावा, असा सल्लाही राजेश टोपे यांनी दिला.

शिवसेना मंत्री संदीपान भूमरेंचं प्रत्युत्तर

महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची ही खदखद बाहेर आल्यानंतर शिवसेना मंत्री संदीपान भूमरे यांनीही याला प्रत्युत्तर दिलंय. राजेश टोपेंना उत्तर देताना संदीपान भूमरे म्हणाले, ‘ आम्ही दादागिरी केली असती तर राजकारणात 35 वर्षे टिकलो नसतो. असे म्हणत आपण सर्वांना सोबत घेऊन आजवर राजकारण केले असून राजेश टोपे यांचे आरोप खोटे असल्याचे ते म्हणालेत ,नेमके राजेश टोपे काय बोलले याची कल्पना नाही, मात्र आपण कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षात घेतले नाही. महाविकास आघाडीत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. काही कार्यकर्तेच्या विनाकारण खोट्या तक्रारी करत असतात असेही भुमरे म्हणालेत. त्यामुळे आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो.

इतर बातम्या-

Ramdas Athawale on Raj Thackeray | एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे; नागपुरात रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका

Maharashtra DGP Loudspeaker Policy : सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापराबाबत अधिकाऱ्याची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता ?

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.