Good News| उद्योगनगरी औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा, जगात पहिल्या 5 शहरांत बाजी, कोणत्या क्षेत्रात विक्रमी घोडदौड?

| Updated on: Jan 24, 2022 | 10:00 AM

इनोव्हॅझिऑन या नियतकालिकाच्या अहवालात औरंगाबादविषयी म्हटलंय, औरंगाबाद हे जवळपास आठ लाख लोकसंख्येचे शहर आहे. ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी आणि फार्मास्युटिकल्स यासारख्या उत्पादन क्षेत्रांत हे शहर प्रगती करत आहे.

Good News| उद्योगनगरी औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा, जगात पहिल्या 5 शहरांत बाजी, कोणत्या क्षेत्रात विक्रमी घोडदौड?
उद्योगनगरी औरंगाबाद
Follow us on

औरंगाबादः एका इटालियन नियतकालिकाने जारी केलेल्या जागतिक यादीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील (International Cities) पहिल्या पाच शहरांमध्ये औरंगाबादने क्रमांक पटकावला आहे. चीनमधील बीजिंग-टियांजिन, मुंबई (Mumbai City), दक्षिण कोरियातील सेऊल, अमेरिकेतील बोस्टन आणि जर्मनातीली डेरेस्डेन ही ही शहरं या यादीत आहेत. आता कोणत्या क्षेत्रात औरंगाबादने ही विक्रमी घोडदौड केलीय, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. गुंतवणूक आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने नवीन विकसनशील शहरांची ओळख करून देणाऱ्या एका इटलीतील नियतकालिकाने ही यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे.

कोणत्या नियतकालिकाचा निष्कर्ष

इटलीतील ग्ली स्टेटी जनरली- इनोव्हॅझिओन- मॅक्रोइकॉनॉमिया या इटालियन मासिकाने नावीन्यपूर्ण उत्पादन घेणाऱ्या जगातील पहिल्या पाच महत्त्वाच्या शहरांत औरंगाबादला स्थान दिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरीत जागतिक दर्जाची नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करणाऱ्या प्रभावी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची औद्योगिक वसाहत असलेल्या शहरांचा यात समावेश करण्यात आला आहे. या नियतकालिकाने जारी केलेल्या यादीतील शहरांमध्ये जागतिक दर्जाची विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांसह आघाडीच्या प्रयोगशाळा आणि कारखाने आहेत. टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि मोठ्या बँका यासारख्या आयसीटी, टेक्सटाइल फार्मास्युटिकल आणि मेकॅनिकल कंपन्यांचे उत्पादन युनिट म्हणून मुंबई-औरंगाबादचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

औरंगाबादविषयी काय म्हटलंय?

इनोव्हॅझिऑन या नियतकालिकाच्या अहवालात औरंगाबादविषयी म्हटलंय, औरंगाबाद हे जवळपास आठ लाख लोकसंख्येचे शहर आहे. ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी आणि फार्मास्युटिकल्स यासारख्या उत्पादन क्षेत्रांत हे शहर प्रगती करत आहे. शहराच्या औद्योगिक वसातही अत्यंत विस्तीर्ण असून त्यात सीमेन्स, बीएमडब्ल्यू, स्कोडा यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्लांट्स आहेत. उद्योगाबरोबरच औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठदेखील आहे. संपूर्ण भारतातील लोकप्रिय विद्यापीठांमध्ये याची गणना होते. विशेष म्हणजे नियतकालिकाने येत्या काही वर्षातील औरंगाबादच्या प्रगतीचा अंदाजही वर्तवला आहे. आगामी काळात शहराची वेगाने भरभराट होईल. विद्यार्थी आणि संशोधक देशभरातून अभ्यास करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी येथे यतात. त्यामुळे शहराच्या क्रमवारीत आणखी सुधारणा होईल.

मुंबई शहराविषयी काय नोंदी?

इटलीतील या जागतिक नियतकालिकानं मुंबई शहराविषयीदेखील विशेष नोंदी घेतल्या आहेत. नियतकालिकाने मुंबईचे वर्गीकरण दक्षिण आशियातील सर्वात महत्त्वाचे मेगा सिटी, जागतिक दर्जाचे आर्थिक, औद्योगिक आणि व्यवसायिक केंद्र आणि प्रचंड कामगार असलेल्या शहरांमध्ये केले आहे. तसेच जीडीपीमध्येही मुंबईचा वाटा 5 टक्के आणि संपूर्ण भारताच्या आर्थिक व्यवहारात 70 टक्के असा आहे.

निर्यातीत औरंगाबादचा डंका

मध्यंतरी राष्ट्रीय पातळीवरील एका सर्वेक्षणातदेखील देशातील महत्त्वाच्या निर्यातक्षम जिल्ह्यांत औरंगाबादचा क्रमांक लागला होता. औरंगाबादमधून अभियांत्रिकी वस्तू, औषधी आणि फार्मास्युटिकल्स, प्लास्टिक आणि लिनोलियम, सेंद्रीय आणि अजैविक रसायनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.

इतर बातम्या-

Video | शिवरायांच्या पुतळ्याची झलक पाहण्यासाठी Aurangabad मध्ये शिवप्रेमींची गर्दी

Start Up | गेल्या वर्षांत तब्बल 2.57 लाख कोटींचा पतपुरवठा, व्हेंचर कॅपिटलमुळे यंदा 50 उदयोन्मुख कंपन्यांना अर्थपुरवठा