Start Up | गेल्या वर्षांत तब्बल 2.57 लाख कोटींचा पतपुरवठा, व्हेंचर कॅपिटलमुळे यंदा 50 उदयोन्मुख कंपन्यांना अर्थपुरवठा

उदयोन्मुख कंपन्यांना (startup) देशातंर्गत मोठ्या प्रमाणात भांडवली पाठबळ मिळत आहे. पतपुरवठ्याच्या इंधनावर या कंपन्यांनी जागतिक पातळीवर भरारी घेतली आहे. गेल्यावर्षी 42 स्टार्टअप्सने युनिकॉर्न क्लबमध्ये स्थान पटकावले होते. यंदा 50 नव्या कंपन्या युनिकॉर्न क्लबमध्ये असतील, असा अंदाज बाजार विश्लेषक नोंदवत आहेत.

Start Up | गेल्या वर्षांत तब्बल 2.57 लाख कोटींचा पतपुरवठा, व्हेंचर कॅपिटलमुळे यंदा 50 उदयोन्मुख कंपन्यांना अर्थपुरवठा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 9:37 AM

भारतात उद्योन्मुख कंपन्यांनी (start up) जागतिक बाजारपेठेत भारताचा डंका वाजविल्यामुळे गेल्या पाच वर्षात अशा स्टार्टअप कंपन्यांची संख्या गतीने वाढत आहे. तसेच त्यांना भांडवल उभारणीला मदत करणारे हात ही पुढे येत आहे. पळत्या घोड्यावर बाजी लावणा-यांची संख्या कमी नसते. कारण ही दमदार घौडदोड त्यांना ही मालामाल करणारी असते. सरकारच्या नव उद्योग धोरणाचा परिणाम लागलीच दिसून आला आहे. नवीन दमाच्या अनेक उद्योगांनी नव-नवीन संकल्पनावर काम करत जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. या नव कंपन्यांना खेळते भांडवल उभे करण्यासाठी अनेक अर्थपुरवठादार पुढे सरसावले. केपीएमजीच्या (KPMG) अहवालानुसार, 2021 दरम्यान भारतात नवउद्योगांसाठी 2.57 लाख कोटी रुपयांची भांडवल (Venture Capital) गुंतवणूक करण्यात आली होती. पतपुरवठ्याच्या इंधनावर या कंपन्यांनी जागतिक पातळीवर भरारी घेतली आहे. गेल्यावर्षी 42 स्टार्टअप्सने युनिकॉर्न क्लबमध्ये स्थान पटकावले होते. यंदा 50 नव्या कंपन्या युनिकॉर्न क्लबमध्ये असतील, असा अंदाज बाजार विश्लेषक नोंदवत आहेत.

फिनटेक क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक

देशातील नवीन कंपन्यांचे भरभराटीचे वातावरण वर्षानुवर्षे सुधारत आहे. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षी व्हेंचर कॅपिटल (VC) गुंतवणूक विक्रमी पातळीवर पोहोचली. केपीएमजीच्या अहवालानुसार, 2021 दरम्यान भारतात 2.57 लाख कोटी रुपयांचा भांडवल पुरवठा करण्यात आला. तिस-या तिमाहीपेक्षा चौथ्या तिमाहीत ही रक्कम घसरली असली तरी एकूण वर्षभरात विक्रमी गुंतवणूक करण्यात आली. फिनटेक सेक्टरमध्ये भांडवलदारांनी अधिक विश्वास दाखविला. या क्षेत्रात भरीव गुंतवणूक करण्यात आली. त्यानंतर आरोग्य क्षेत्रात, बिझनेस टू बिझनेस आणि ग्राहकोपयोगी उत्पादन कंपन्यांत गुंतवणूक करण्यात आली. यंदा डिसेंबर 2022 पर्यंत किमान 50 स्टार्टअप्स युनिकॉर्न बनू शकतात.

मोदी सरकारच्या काळात भारतीय उदयोन्मुख उद्योगांनी (Indian startups) काळाची गती ओळखून आघाडी घेतली आहे. केवळ ५ वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप बाजारपेठ बनली आहे. १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या स्टार्टअप्सच्या यादीत (Startup Unicorn) तिस-या स्थानी भारताने झेंडा रोवला आहे. जगातील तिसरी महासत्ता होण्याच्या दिशेने भारत मार्गाक्रमण करत आहे. भारतीय स्टार्टअप्सने जागतिक बाजाराला दखल घ्यायला लावली आहे. एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचे भांडवली मूल्य असणा-या नव्या दमाच्या उद्योगांमध्ये भारताने जागतिक पातळीवर तिस-या पातळीवर धडक मारली आहे. या स्पर्धेत अमेरिका आघाडीवर आहे तर चीन दुस-या स्थानी आहे. अमेरिकेत सध्या 487 तर चीनमध्ये 301 युनिकॉर्न आहेत. भारतात स्टार्टअप उद्योगाला चालना मिळाल्यापासून 42 युनिकॉर्न भारताची आघाडी संभाळत आहेत.

पाच वर्षांत व्हीसी इन्व्हेस्टमेंट

वर्ष         गुंतवणूक (कोटी) 2017        85,871 2018         59,436 2019        1,10,364 2020          95,720 2021          2,56,801

संबंधित बातम्या :

वर्ष 2022 ‘टाटागिरी’चं: उत्पादनात वाढ ते इलेक्ट्रॉनिक गाड्यांना वेटिंग, टाटा मोटर्सचा आत्मविश्वास!

धमाकेदार ऑफर! 5.55 लाखांची Renault कार 2.7 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Budget 2022: डिजिटल आरोग्य सेवा ते टेलि-मेडिसिन, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला झुकतं माप?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.