शिवसैनिक सुमंत रुईकर यांचं अर्धवट राहिलेलं घराचं स्वप्न अखेर पूर्ण; बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त भूमिपूजन; एकनाथ शिंदे भावूक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड येथून तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना अचानक निधन झालेले कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचं अर्धवट राहिलेलं घराचं स्वप्न नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन पूर्ण केले आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून रुईकर यांच्या बीडमधील नवीन घरकुलाचे भूमीपूजन पार पडले.

शिवसैनिक सुमंत रुईकर यांचं अर्धवट राहिलेलं घराचं स्वप्न अखेर पूर्ण; बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त भूमिपूजन; एकनाथ शिंदे भावूक
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 5:15 PM

औरंगाबाद  :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड येथून तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना अचानक निधन झालेले कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर (Sumant Ruikar) यांचं अर्धवट राहिलेलं घराचं स्वप्न नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुढाकार घेऊन पूर्ण केले आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून रुईकर यांच्या बीडमधील नवीन घरकुलाचे भूमीपूजन पार पडले. या भूमीपूजन सोहळ्याला व्हीसीद्वारे उपस्थित राहून, मंत्री शिंदे यांनी रुईकर कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याचे यावेळी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पाठीच्या मणक्याची  शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना लवकर बरं वाटावं तसेच त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी पायी तिरुपती बालाजीला जाण्याचा संकल्प केला होता. मात्र दुर्दैवाने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

वाटेतच मृत्यू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना लवकर बरं वाटावं तसेच त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी पायी तिरुपती बालाजीला जाण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी पायी चालायला सुरुवात देखील केली. मात्र रस्त्यात अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 26 डिसेंबर रोजी कर्नाटकमधील रायचूर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे सम्पूर्ण कुटुंब निराधार झाले होते. ही बातमी समजल्यावर शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत पाठवली होती. तसेच, ही मदत दिल्यावर फोन करून त्यांची विचारपूस देखील केली होती. मात्र, त्यानंतर आज एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी सुमंत रुईकर यांचं अर्धवट राहिलेलं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. आज रुईकर यांच्या नवीन घराचं भूमिपूजन बीड येथे पार पडले.

लवकरात – लवकर घर तयार करण्याच्या सूचना

‘रुईकर यांचा मृत्यूची बातमी ही सगळ्यांसाठीच अतिशय वेदनादायी होती. या एका कट्टर शिवसैनिकाचा असा करूण अंत झाल्याचे पाहून माझे मन हेलावून गेले होते. मात्र, अशा या अवघड परिस्थितीत या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय शिवसेनेच्या वतीने मी घेतला. तसेच, बीडमधील शिवसेना कार्यकर्त्यांना निर्देश देऊन हे घर लवकरात लवकर बांधून देण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानुसार आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी या घराचे भूमीपूजन होत असल्याचा विशेष आनंद होत आहे,’ असे शिंदे यांनी सांगितले. सुमंत यांनी हे घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते, ते त्यांच्या संकल्पनेनुसार बांधून पूर्ण करणे हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी श्रद्धांजली ठरेल असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

कीर्ती रुईकरांनी मानले शिवसेनेचे आभार

सुमंत रुईकर यांच्या पत्नी कीर्ती रुईकर यांनी मंत्री शिंदे यांचे आभार मानले. पती गेल्यानंतर शिवसेनेने आपल्याला खंबीरपणे आधार दिला असून, पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांनी केलेल्या मदतीबद्दल आपण समाधानी आहोत. आज माझे पती हयात नसले तरीही त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचा विशेष आनंद आम्हा रुईकर कुटुंबियांना आहे. हे घर बांधून पूर्ण झाल्यानंतर गृहप्रवेश करताना एकनाथ शिंदे यांनी आमच्या घराला भेट द्यावी असे यावेळी कीर्ती रुईकर यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी रुईकर कुटुंबासह, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, स्थानिक शिवसैनिक बाजीराव चव्हाण, बीड जिल्ह्यातील समस्त शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधीच शिवसेनेचं ‘एकला चलो रे?’; बडा नेता म्हणाला, महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता दिसेल

मुंबईतील पहिल्या ‘सेफ स्कूल झोन’चा प्रयोग यशस्वी; 93 टक्के विद्यार्थ्यी म्हणाले, पूर्वीपेक्षा रस्त्यावरून चालणे अधिक सोपे

‘बाळासाहेब असते तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झालीच नसती’, सुधीर मुनगंटीवारांकडून सेनेला डिवचण्याचा प्रयत्न

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.