मुंबईतील पहिल्या ‘सेफ स्कूल झोन’चा प्रयोग यशस्वी; 93 टक्के विद्यार्थ्यी म्हणाले, पूर्वीपेक्षा रस्त्यावरून चालणे अधिक सोपे

मुंबईतील पहिल्या 'सेफ स्कूल झोन'चा प्रयोग यशस्वी; 93 टक्के विद्यार्थ्यी म्हणाले, पूर्वीपेक्षा रस्त्यावरून चालणे अधिक सोपे
safe zone

मुंबईतील पहिल्या सेल्फ स्कूल झोनचा सर्व्हे जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील भायखळ्यातील ख्राइस्ट चर्च शाळेतील 93% विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेसमोरील रस्त्यावरून त्यांना आता अधिक मोकळेपणे वापरता येत असल्याचं स्पष्ट केलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 23, 2022 | 4:42 PM

मुंबई: मुंबईतील पहिल्या सेल्फ स्कूल झोनचा सर्व्हे जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील भायखळ्यातील ख्राइस्ट चर्च शाळेतील 93% विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेसमोरील रस्त्यावरून त्यांना आता अधिक मोकळेपणे वापरता येत असल्याचं स्पष्ट केलं. पादचाऱ्यांच्या क्रॉसिंगच्या जागी सामान्य झेब्रा क्रॉसिंगच्या आधी 9.8% वाहनचालक वाहनाचा वेग कमी करतात. त्या तुलनेने शाळेच्या बाहेरील लक्षवेधी झेब्रा क्रॉसिंगच्या आधी 41% वाहनचालकांनी वाहनांचा वेग कमी केला असल्याचं या सर्व्हेतून दिसून आलं आहे.

शाळेबाहेर सेफ स्कूल झोन तयार करण्यात आला. त्या रस्त्याचा वापर करणाऱ्यांचे, विशेषतः मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांनी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), इंडिया रॉस सेंटर यांच्यासह ग्लोबल रोड सेफ्टीसाठी (जागतिक पातळीवर रस्ते सुरक्षा) ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीजअंतर्गत सेफ स्कूल झोन प्रायोगिक तत्वावर सुरू केला. मुंबईत बालकस्नेही आणि चालण्यासाठी सुयोग्य शालेय झोन तयार करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

कोन्स, बॅरिकेड्स, प्लँटर्स, खडू आणि पेंटचा वापर

भायखळा येथील ख्राइस्ट चर्च शाळेसमोरील मिर्झा गालिब रोड किंवा क्लेअर रोडवर या प्रकल्पाची पहिली चाचणी करण्यात आली. हा रस्ता सर्व वापरकर्त्यांसाठी विशेषतः मुलांसाठी चालण्यासाठी सुयोग्य, सुरक्षित आणि चैतन्यदायी करण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले होते. या प्रयत्नांचा भाग म्हणून कोन्स, बॅरिकेड्स, प्लँटर्स, खडू आणि पेंटचा वापर करून शाळेचा झोन निश्चित करण्यात आला. तसेच वाहतुकीला दिशा देण्यात आली. तिची रहदारी व वेगाचे नियमन करण्यात आले. रस्त्यावरील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि चालण्यासाठी व रस्ता ओलांडण्याआधी थांबण्यासाठी जागा निश्चित केली गेली.

आदर्श प्रयोग

लोकांसाठी, विशेषतः मुलांसाठी सुरक्षित रस्त्यांची रचना केल्याने रस्ते सगळ्यांसाठीच सुरक्षित होतील. मुंबईतील सेफ स्कूल झोन प्रयोग हा भारतातील सर्व शहरांसाठी बालक-स्नेही रस्त्यांची रचना निर्माण करण्यासाठी आदर्श प्रारुप असेल, असं समाजवादी पक्षाचे भायखळ्याचे नगरसेवक आणि आमदार रईस शेख यांनी सांगितलं.

सर्वेक्षणाबद्दल

या प्रयोगाच्या परिणामाचे मूल्यमापन करण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले की, या प्रयोगामध्ये जवळपास 100% मुलांना रस्ते सुरक्षित आढळून आले. या प्रयोगाच्या आधी व नंतर 40 मुले, 40 पादचारी, 20 व्यावसायिक आणि 20 वाहनचालकांची मुलाखत घेण्यात आली.

म्हणून सर्वेक्षण महत्त्वाचे

अल्पकालीन उपाययोजना एक आठवडाभर राबविण्यात आल्या. या परिवर्तनाबाबत महत्त्वाचे भागधारक, विशेषतः मुले कशी प्रतिसाद देतात ते समजून घेण्यासाठी सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. स्कूल झोन डिझाइन प्रस्ताव निश्चित करण्याआधी मुलांसोबतच व्यावसायिक, वाहनचालक यांचा समावेश असलेल्या स्थानिकांचेही सर्वेक्षण करण्यात आले, असं डब्ल्यूआरआय इंडियाच्या इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक रोहित टाक यांनी सांगितलं.

सर्वेक्षणातील ठळक मुद्दे

पादचाऱ्यांच्या रस्ता ओलांडण्याच्या झेब्रा क्रॉसिंगच्या आधी केवळ 9.8% वाहनचालक थांबले तर लक्षवेधी झेब्रा क्रॉसिंगच्या आधी 41.3% वाहनचालक थांबले

विद्यार्थ्यांनी काय सांगितलं?

या प्रयोगादरम्यान रस्ता अधिक मोकळेपणी वापरता आल्याचे 93% विद्यार्थ्यांना वाटले

या प्रयोगादरम्यान रस्ता अधिक सुरक्षित असल्याचे 100% विद्यार्थ्यांना वाटले

या प्रयोगादरम्यान रस्त्यावर प्रतीक्षा करण्यासाठी/तात्पुरते थांबण्यासाठी आरामदायी ठिकाण असल्याचे ६८% विद्यार्थ्यांना वाटले.

इतर पादचाऱ्यांना काय वाटलं?

या प्रयोगादरम्यान रस्ता अधिक मोकळेपणी वापरता आल्याचे 90% वापरकर्त्यांना वाटले

या प्रयोगादरम्यान रस्ता अधिक सुरक्षित असल्याचे 98% वापरकर्त्यांना वाटले

या प्रयोगादरम्यान रस्त्यावर प्रतीक्षा करण्यासाठी/तात्पुरते थांबण्यासाठी आरामदायी ठिकाण असल्याचे 64% वापरकर्त्यांना वाटले.

वाहनचालाकांच्या प्रतिक्रिया

या परिसरात शाळा असल्याचे सूचित करणारे चिन्ह आहे, याची या प्रयोगादरम्यान 90% वाहनचालकांना जाणीव होती.

या परिसरात वाहनचालकांना वेग कमी करण्यास सूचित करणारे चिन्ह आहे याची या प्रयोगादरम्यान 76% वाहनचालकांना जाणीव होती.

संबंधित बातम्या:

MPSC | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला!, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधीच शिवसेनेचं ‘एकला चलो रे?’; बडा नेता म्हणाला, महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता दिसेल

पी. व्ही. सिंधू, डॉ. राजम आणि टांक बुंद हनुमंतू यांना ‘नेताजी’ पुरस्कार प्रदान

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें