औरंगाबादेत संत एकनाथ रंगमदिराचे खासगीकरण थांबवा, अन्यथा कलावंतांना घेऊन रस्त्यावर उतरू, मनसेचा इशारा

औरंगाबादमधील एका खासगी काँट्रॅक्टरला संत एकनाथ रंगमंदिर चालवण्यासाठी दिले जाणार आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे रंगमंदिर खासगी तत्त्वावर चालवण्यासाठी देऊ नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

औरंगाबादेत संत एकनाथ रंगमदिराचे खासगीकरण थांबवा, अन्यथा कलावंतांना घेऊन रस्त्यावर उतरू, मनसेचा इशारा
संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणाला मनसेचा विरोध
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 5:26 PM

औरंगाबादः शहरातील संत एकनाथ रंगमंदिराच्या (Sant Eknath Rangmandir) खासगीकरणाचा वाद आता चांगलाच पेटणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील हे नाट्यगृह काही वर्षांपासून नूतनीकरणाच्या कारणास्तव बंद होते. नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून हे मंदिर उघडण्यासाठी सज्ज आहे. त्याच वेळी रंगमंदिराचे खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एका खासगी काँट्रॅक्टरला रंगमंदिर चालवण्यासाठी दिले जाणार आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे रंगमंदिर खासगी तत्त्वावर चालवण्यासाठी देऊ नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

मनसेची भूमिका काय?

मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले, ‘ खासगीकरणाच्या विरोधात नाहीत. पण नाट्यगृहासाठी 10 कोटी रुपये खर्च केले असतील, तर तुम्ही आता पुन्हा एका काँन्ट्रॅक्टरला हे का द्यायचं? हेच करायचं असतं तर 2017 मध्ये याविषयी टेंडर काढलं. तेव्हा या नूतनीकरणाचा अंदाजे खर्च अडीच हजार कोटी होता. तेव्हाच हे टेंडर काढून बीओटी तत्त्वावर करत त्याचे खासगीकरण करता आलं नसतं का? पण महापालिकेचे अधिकारी, शिवसेनेला या प्रकरणात पैसे खायचे होते. यात आजपर्यंत तब्बल 10 कोटी रुपये खर्च कऱण्यात आलाय. खासगीकरणाचा हा सगळा प्रकार ठरलेलाच आहे. दिल्लीत अनेक सरकारी गोष्टी चांगल्या पद्धतीने चालू आहे. स्वतंत्र व्यवस्थापक आणि पाच-सहा जणांची टीम नेमून महापालिकादेखील नाट्यगृहाची व्यवस्था पाहू शकते. एवढा खर्च करून पुन्हा नाट्यगृह खासगीकरण करायचा निर्णय होत असेल तर आमचा याला स्पष्ट विरोध आहे, अशी भूमिका मनसेने मांडली.

…अन्यथा कलावंतांना घेऊन रस्त्यावर उतरणार!

महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात निवेदन सादर केले आहे. तसेच नाट्यगृहाचे खासगीकरण थांबवण्याची विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी नाट्यगृह कशाप्रकारे चालवले जाऊ शकते, याविषयीचे पर्यायदेखील सूचलवले आहेत. मात्र लोकशाही मार्गाने केलेली ही विनंती प्रशासनाने ऐकली नाही तर कलावंतांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, अशा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

इतर बातम्या-

गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीवरुन चंद्रकांतदादांनी राऊतांना फटकारलं, 2017 च्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीच सांगितली

Papaya: दर निश्चिती होऊनही अंमलबजावणी नाही, बाजार समितीच्या निर्णयाला कुणाचा अडसर?