Papaya: दर निश्चिती होऊनही अंमलबजावणी नाही, बाजार समितीच्या निर्णयाला कुणाचा अडसर?

Papaya: दर निश्चिती होऊनही अंमलबजावणी नाही, बाजार समितीच्या निर्णयाला कुणाचा अडसर?
पपईचे दर निश्चित होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने 4 रुपये 75 पैशाप्रमाणे दर निश्चित केले होते. त्यामुळे हा दर कमी असला तरी शाश्वत दरामुळे पिकाचे योग्य नियोजन केले जाईल असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र, निर्णय तर झाला पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 18, 2022 | 5:06 PM

नंदुरबार : खानदेशात पपईचे क्षेत्र जास्त आहे. मात्र, दर निश्चित नसल्यामुळे (Papaya Area) पपई क्षेत्रात काळाच्या ओघात घट होत आहे. अधिकचे उत्पन्न होऊनही सातत्याने दराचा प्रश्न निर्माण होत असल्याने (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने 4 रुपये 75 पैशाप्रमाणे दर निश्चित केले होते. त्यामुळे हा दर कमी असला तरी शाश्वत दरामुळे पिकाचे योग्य नियोजन केले जाईल असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र, निर्णय तर झाला पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम आहेत. बैठकीत ठरलेला दर प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये दिला जात नाही. (Buyer) खरेदीदार मनमानी करीत हे दर ठरवतात त्यामुळे अधिकचे उत्पन्न तर नाही पण झालेला खर्चही शेतकऱ्यांना मिळत नाही. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने दरात घट होत आहे. त्यामुळे काढणीही परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पपई क्षेत्रात घट होऊ लागली आहे. 4 रुपये 75 हा दर मुळातच कमी आहे. असे असतानाही त्याची अंमलबजावणीच होत नाही.

कशामुळे घेण्यात आला होता निर्णय?

हमीभाव केंद्रावर जसे शेतीमालाचे दर निश्चित केले जातात अगदी त्याप्रमाणेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बाजारपेठेत दर निश्चित करण्यात आले होते. पपईला सुरवातीपासूनच कमीचा दर आहे. असे असताना दराचा कायम तिढा असल्याने बाजार समिती प्रशासनाने शेतकरी आणि खरेदीदार यांना घेऊन बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये खरेदीदार यांच्या म्हणण्यानुसारच दर ठरविण्यात आला. मात्र, आवक जास्त झाली की, खरेदीदार हे मनमानी कारभार करीत पाडून मागणी करतात. त्यामुळे बैठक होऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायम आहेतच

सर्वाधिक क्षेत्र शहादा तालुक्यात

पपई हे खानदेशात अधिक क्षेत्रावर घेतली जाते. मात्र, सुरवातीपासूनच दराबाबतचे धोरण हे ठरलेले नाही. त्यामुळे खरेदीदार मागतील तोच दर ग्राह्य धरला जात होता. मात्र, दरावरुन कायम मतभेद होत असल्याने प्रति किलो 4 रुपये 75 पैसे असा दर ठरविण्यात आला होता. पण याची अंमलबजावणीच होत नाही. शहादा तालुक्यात 4 हजार हेक्टरावर पपई लागवड केली जाते. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या भागातही लागवड बऱ्यापैकी आहे. पपई दर ऑक्टोंबरमध्ये स्थिर होते. पण नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये दरात सतत घट झाली. आता दर पाच रुपये प्रति किलो देखील नाहीत.

घटत्या दरामुळे बागांची मोडणी

पपईच्या दराचा प्रश्न कायम चर्चेत राहिलेला आहे. त्यामुळे हा मधला मार्ग काढला असताना त्याची अंमलबजावणीच झाली नाही. दरातील अस्थिरतेमुळे अनेकांनी बाग मोडणी पसंत करुन इतर पिकाचे उत्पादन घेणे पसंत केले आहे. सध्याच्या दरानुसार उत्पादनावर झालेला खर्चही निघणे मुश्किल असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. सध्या खानदेशात 15 टन पपईची आवक होत आहे. परराज्यातील व्यापारी हे येथील एजंटच्या मदतीने खरेदी करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Sugarcane Sludge : क्षेत्र वाढले, गाळप रखडले आता अवघे दोन महिने उरले..!

Soybean Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांची भूमिका बदलली, आवक वाढली दराचे काय?

कृषी विभागाची भूमिका बजावत आहे ‘शिवार’ फाऊंडेशन, शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें