गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीवरुन चंद्रकांतदादांनी राऊतांना फटकारलं, 2017 च्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीच सांगितली

गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीवरुन चंद्रकांतदादांनी राऊतांना फटकारलं, 2017 च्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीच सांगितली
संजय राऊत, चंद्रकांत पाटील

गोव्यात उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्याला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाटील यांनी काल संजय राऊतांना गोव्यातून लढण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता पाटील यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी मांडत शिवसेना आणि राष्ट्रवादीला जोरदार टोला लगावला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 18, 2022 | 5:09 PM

मुंबई : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा विधानसभा निवडणुकीवरुन (Goa Assembly Election) राज्यात भाजप विरुद्ध शिवसेनेत जोरदार टीकाटिप्पणी सुरु आहे. गोव्यात उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्याला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाटील यांनी काल संजय राऊतांना गोव्यातून लढण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता पाटील यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी मांडत शिवसेना आणि राष्ट्रवादीला जोरदार टोला लगावला आहे.

गोवा आणि उत्तर प्रदेशातील शिवसेनेची स्थितीच पाटलांनी मांडली

शिवसेनेचे महान नेते संजय राऊत गोवा आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबाबत बोलत आहेत. कालही मी बोललो होतो, आता अधिकृत आकडेवारी सांगतो. गोव्यात 2017 ला शिवसेना लढली तेव्हा 3 जागा लढवून त्यांना 792 मतं मिळाली. सर्व तीन जागांवर डिपॉझिट जप्त झालं. आता हे गोव्यात सरकार बनवणार, सरकार बनवणाऱ्यांना मदत करणार तर उत्तर प्रदेशात शिवसेनेनं 57 जागा लढल्या. 88 हजार 752 मतं मिळाली. 11 कोटी मतदारांमध्ये 88 हजार 595 मतं मिळाली. 57 पैकी 56 जागांवर डिपॉजिट जप्त झालं. आता हे उत्तर प्रदेशात टिकैत यांना, अखिलेश यादवांना आवाहन करणार आहेत की आम्हाला सोबत घ्या, असा टोला पाटील यांनी राऊतांना लगावलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्थाही सांगितली

तर एनसीपी उत्तर प्रदेशात 30 जागा लढली. सर्व जागांवर डिपॉझिट जप्त झालं. एकूण मतं मिळाली. 33 हजार 494. गोव्यात एनसीपी 40 पैकी 17 जागा लढली. पैकी 16 जागांवर डिपॉझिट जप्त झालं. एकूण मतं पडली 20 हजार 916. अरे कशल्या गमज्या चालल्या आहेत? लोकशाहीची कसली थट्टा लावली आहे? असा खोचक सवालही चंद्रकांतदादांनी विचारला आहे.

‘नुसती भाषणं कसली करता, हिंमत असेल तर लढा’

‘संजय राऊत यांचं फारच चाललं आहे. सगळ्या जगातले विद्वान ते आहेत. कशाला त्यांनी पर्रिकरांच्या मुलाला द्या, अपक्ष लढू दे, तुमचं कोण ऐकायला बसलं आहे तिथे. हिम्मत असेल तर गोव्यातला एखादा मतदारसंघ लढवा तुम्ही. मोदीची गुजरातमधून उठतात आणि उत्तर प्रदेशात जाऊन लढतात, तुम्ही लढा. नुकती आपली भाषणं करता’, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी काल संजय राऊत यांना फटकारलं होतं.

इतर बातम्या :

नाना पटोलेंसह मलिकांविरोधात गावोगावी तक्रारी दाखल करा, चंद्रकांतदादांचे कार्यकर्त्यांना आदेश

राणेंना अटक, पटोलेंना का नाही? मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, उपकार नाही, फडणवीसांचा हल्लाबोल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें