Aurangabad Murder Case | सुखप्रित कौर हत्येच्या तपासासाठी SIT ची स्थापना, न्यायालयात भक्कम पुराव्यानिशी उतरणार!

शनिवारी 21 मे रोजी देवगिरी महाविद्यालयाजवळ भर दिवसा सुखप्रीतसिंगवर एकतर्फी प्रेमातून एकाने चाकूचे 17 वार केले. या घटनेत कशिशचा मृत्यू झाला.

Aurangabad Murder Case |  सुखप्रित कौर हत्येच्या तपासासाठी SIT ची स्थापना, न्यायालयात भक्कम पुराव्यानिशी उतरणार!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 1:54 PM

औरंगाबादः शहरातील एमजीएम महाविद्यालायातील (MGM Collage) विद्यार्थिनीच्या अत्याचार व खून प्रकरणी आरोपीवरील दोष सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर नुकत्याच घडलेल्या एका खून प्रकरणात संपूर्ण ताकदीनिशी तपास करण्याचं औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) ठरवलं आहे. देवगिरी महाविद्यालयातील बीबीएची विद्यार्थिनी सुखप्रीतसिंग कौर (Sukhprit Kaur) ऊर्फ कशिशच्या क्रूर हत्येनंतर आरोपी शरणसिंग सेठी याला गुन्हे शाखेने तत्काळ अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात तरी आरोपीवरील गुन्हे सिद्ध करण्यात पोलीस अपयशी होऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याामुळे कशिशचा खटला न्यायालयात भक्कमपणे मांडून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकात दोन वरिष्ठ, दोन उपनिरीक्षकांसह दोन कर्मचाऱी असतील. बुधवारी यासंदर्भातली बैठक पोलीस आयुक्तालयात पार पडली.

एकतर्फी प्रेमातून कशिशची हत्या

शनिवारी 21 मे रोजी देवगिरी महाविद्यालयाजवळ भर दिवसा सुखप्रीतसिंगवर एकतर्फी प्रेमातून एकाने चाकूचे 17 वार केले. या घटनेत कशिशचा मृत्यू झाला. दुपारच्या वेळी भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने तपास करत या घटनेतील आरोपी शरणसिंग सेठीला 24 तासाच्या आत पकडलं. मात्र आता तपासात भक्कम पुरावे हाती घेण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे.

हे सुद्धा वाचा

नागरिकांचा संताप, दोषीला फाशी देण्याची मागणी

कशिशची अशा प्रकारे निर्घृण हत्या केल्यानंतर देविगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शेकडो तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी अहिल्याबाई होळकर चौक ते क्रांती चौकापर्यंत कँडल मार्च काढून मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी केली . त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. सबळ पुरावे, तपासात त्रुटी राहू नये, तसेच आरोपीला शिक्षा होण्यासाठी न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी प्रभावी कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी पथकावर सोपवली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.