औरंगाबाद-हैदराबाद एक्सप्रेस रेल्वे दोन तास उशीराने धावणार, 17 दिवस लाइन ब्लॉक, वाचा कोणत्या दिवशी वेळेत बदल?

औरंगाबाद-हैदराबाद एक्सप्रेस रेल्वे दोन तास उशीराने धावणार, 17 दिवस लाइन ब्लॉक, वाचा कोणत्या दिवशी वेळेत बदल?
प्रातिनिधिक छायाचित्र

18 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आठवड्यातीन तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी 180 मिनिटांचा लाइन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दुपारी 3.05 पासून सायंकाळी 6.05 वाजेपर्यंत घेतला जाईल.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 19, 2022 | 10:07 AM

औरंगाबादः औरंगाबाद ते हैदराबाद एक्सप्रेस आणि काचीगुडा ते रोटेगाव ही विशेष गाडी या दोन गाड्या पुढील 17 दिवस उशीराने धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. करमाड ते चिकलठाणा सेक्शनमधील रेल्वे पटरीचे नूतनीकरण (थ्रू स्लीपर रिन्यूव्हल) चे काम सुरु आहे. त्यामुळे 18 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आठवड्यातीन तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी 180 मिनिटांचा लाइन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दुपारी 3.05 पासून सायंकाळी 6.05 वाजेपर्यंत घेतला जाईल. हे काम पूर्ण करण्यासाठी 17 ब्लॉक घेतले जातील. त्यामुळे औरंगाबाद ते हैदराबाद एक्सप्रेस आणि काचीगुडा ते रोटेगाव विशेष गाडी या दोन गाड्या पुढील 17 दिवस उशीरा धावतील.

कोणत्या दिवशी, किती वाजता सुटणार?

हा लाइन ब्लॉक 19, 22, 24, 26, 29, 31 जानेवारी तसेच 2, 5, 7, 9, 12, 14, 16, 19, 21, 23, 26 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी उपरोक्त दोन रेल्वे गाड्या उशीरा धावतील. लाइन ब्लॉकच्या दिवशी गाडी क्रमांक 17650 औरंगाबाद-हैदराबाद एक्सप्रेस ही रेल्वे औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून दुपारी 04.15 ऐवजी दोन तास उशीरा म्हणजेच 06.05 वाजता सुटेल. लाइन ब्लॉकच्या दिवशी गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-रोटेगाव विशेष गाडी जालना ते करमाडदरम्यान 40 मिनिटे उशीरा धावेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

इतर बातम्या-

Video : अंडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मोरानं शिकवला चांगलाच धडा, झडप घातली आणि…

TDR scam | नाशिकमधील 100 कोटींच्या टीडीआर घोटाळाप्रकरणी अहवाल सादर; काय कारवाई होणार?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें