AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Fire | धावत्या बसखाली अचानक दुचाकी घुसली, एसटीने क्षणात घेतला पेट, प्रवासी बचावले, दुचाकीस्वार जखमी

सुदैवाने बसमधील प्रवाशांना वेगाने बाहेर काढण्यात आले. मात्र आगीच्या तडाख्यात संपूर्ण एसटी आणि बसखाली आलेली दुचाकी जळून खाक झाली. या अपघातात दुचाकस्वार संजय गायकवाड हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.

Aurangabad Fire | धावत्या बसखाली अचानक दुचाकी घुसली, एसटीने क्षणात घेतला पेट,  प्रवासी बचावले, दुचाकीस्वार जखमी
वैजापूरमध्ये बसला आगImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 10:25 AM
Share

औरंगाबादः एकिकडे दौलताबाद किल्ला परिसरात (Daulatabad fire) शुक्रवारी दुपारी आगीचे लोळ उठत होते तर वैजापूर (Vaijapur) तालुक्यातही एक भीषण घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसखाली अचानक दुचाकी आल्याने बसला भीषण आग लागली. दहा-पंधरा मिनिटातच या बसने पेट घेतला. संपूर्ण बस आगीच्या (ST Bus Fire) भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने बसमधील प्रवाशांना वेगाने बाहेर काढण्यात आले. मात्र आगीच्या तडाख्यात संपूर्ण एसटी आणि बसखाली आलेली दुचाकी जळून खाक झाली. या अपघातात दुचाकस्वार संजय गायकवाड हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर बसचे चालक आणि वाहकही सुखरूप आहेत.

काय घडली नेमकी घटना?

वैजापूर आगाराची वैजापूर-कन्नड ही एसटी चालक के जी ठुपके आणि वाहक अनिल पवार हे दोघे चालवत होते. कन्नड येथून दुपारी चार वाजेच्या सुमारास रोटेगाव रेल्वेस्टेशनच्या उड्डाणपुलावर बसच्या पुढील चाकाखाली दुचाकी फरफटत घुसली. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. यात भाजप युवा मोर्चाचे केतन आव्हाळे, बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर, संतोष बंगाळ, अक्षय बंगाळ, मनोज गाढे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी बसकडे धाव घेतली. प्रवाशांना त्यांनी सुरक्षितपणे खाली उतरवून घेतले.

प्रवासी बचावले, दुचाकीस्वार जखमी

वैजापूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर दुपारी हे अग्नितांडव घडले. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. मात्र आग डिझेलच्या टाकीपर्यंत गेली असती तर मोठा स्फोट झाला असता. त्यामुळे नागरिकांना खूप दूर अंतरावर उभे रहाण्याचे आवाहन करण्यात आले होते. या बसमधील 17 प्रवासी सुखरुप असून बसखाली आलेले दुचाकीस्वार मात्र गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या-

Nagpur | कोरोनात 100 पेक्षा जास्त बालविवाह झाल्याची शक्यता! 17 बालविवाह बालकल्याण विभागाने रोखले

Cotton Crop : पुन्हा पांढऱ्या सोन्याने बहरणार शिवार, घटलेले क्षेत्र कशामुळे वाढणार?

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.