Babanrao Lonikar Audio Clip : माजलात का तुम्ही, बबनराव लोणीकरांचा तोल गेला; अभियंत्याला शिवीगाळ? ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Mar 30, 2022 | 7:15 PM

ज्यांची वीजबिलं थकली आहेत, त्यांची वीज तोडणी महावितरणाकडून सुरू आहे. अशातच आता मात्री मंत्री बबनरावा लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या नावाने एक ऑडिओ क्लिप (Viral Audio Clip) सध्या व्हायरल होत आहे. ज्यात ते एका वीज अभियंत्याला शिवीगाळ करताना दिसून येत आहेत, त्या ऑडिओ क्लिपवर त्यांचं स्पष्टीकरणही आले आहे.

Babanrao Lonikar Audio Clip : माजलात का तुम्ही, बबनराव लोणीकरांचा तोल गेला; अभियंत्याला शिवीगाळ? ऑडिओ क्लिप व्हायरल
बबनराव लोणीकरांच्या नावाने ऑडिओ क्लिप व्हायरल
Image Credit source: tv9
Follow us on

औरंगाबाद : राज्यात वीजबिलाच्या मुद्द्यावरून (Electricity Bill) सध्या चांगल्याच ठिणग्या उडत आहेत. ज्यांची वीजबिलं थकली आहेत, त्यांची वीज तोडणी महावितरणाकडून सुरू आहे. अशातच आता मात्री मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या नावाने एक ऑडिओ क्लिप (Viral Audio Clip) सध्या व्हायरल होत आहे. ज्यात ते एका वीज अभियंत्याला शिवीगाळ करताना दिसून येत आहेत, त्या ऑडिओ क्लिपवर त्यांचं स्पष्टीकरणही आले आहे. औरंगाबादेत मध्ये भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा बांगला आहे. त्याचे साडेतीन लाख रुपये बिल पेंडिंग आहे. आता महावितरणने वीज कापली, त्यामुळं आमदार महोदय भडकले आणि थेट अभियंत्याला त्यांनी शिवीगाळ केली. चोरांना पकडत नाही आणि बिल भरणाऱ्याला त्रास देतात. माजले का तुम्ही या शब्दात त्यांनी अभियंत्याला सुनावले असल्याची ऑडिओ क्लिप समोर आली. तुमच्यावर income टॅक्स रेड करेल तुमची प्रॉपर्टीची कुंडली काढणार, ऊर्जा मंत्री माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना सांगून तुम्हाला निलंबित करेल, असे लोणीकर यांनी सुनावले आणि माझं मीटर जोडा अशी तंबीही दिलीय, ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. लोणीकरांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

लोणीकरांच्या नावाने ऑडिओ क्लीप व्हायरल

ऑडिओ क्लीपमध्ये नेमकं काय?

आमदार बबनराव लोणीकर – बबनराव लोणीकर बोलतोय आमदार.

दादासाहेब काळे, इंजिनिअर – नमस्कार साहेब बोला.

आमदार बबनराव लोणीकर – तुम्ही मीटर काढून नेलं का माझं?

दादासाहेब काळे, इंजिनिअर – नाही , मी कुठं काढून नेलं.

आमदार बबनराव लोणीकर – अरे नालायकांनो, आम्ही बिल भरतो. मी 10 लाख रुपये बिल भरलं, औरंगाबादचं. तुमच्या XXXदम आहे का? हिंमत आहे तर तुमच्यात… झोपडपट्टीत जा.. जे लोकं आकडे टाकतात त्यांच्याकडे जा. आम्ही पैसे भरतो. दोन मीटरचे मी 10 लाख रुपये भरले आहेत मी या वर्षात.

दादासाहेब काळे, इंजिनिअर – नाही सर, मी दोनदा येऊन गेलो.

आमदार बबनराव लोणीकर – एका मिनिटात घरी पाठवेल तुला. माज चढला का, पैसे आम्ही भरतो. ज्यांच्याकडे आकडे आहेत ना त्यांच्याकडे जा हिंमत असेल तर.

दादासाहेब काळे, इंजिनिअर – मीटर नाही काढून नेलं.

आमदार बबनराव लोणीकर – आमचं मीटर का काढून नेलं, नोटीस दिली का तुम्ही? मी पागल आहे का. मीटर काढून नेलं म्हणून बोलतोय.

दादासाहेब काळे, इंजिनिअर – सर तुमच्या बंगल्याचं मीटर आहे तिथेचं आहे. तीन लाखांचं बिल आहे.

आमदार बबनराव लोणीकर – तुम्ही मीटर काढून नेलं, मला फोन आला होता आता आमच्या ड्रायव्हरचा. पैसे भरतो ना आम्ही. नोटीस द्या. वीज वितरण कंपनी स्थापन झाली. कायद्यात नियम आहे तुम्हाला नोटीस दिल्याशिवाय असं करत येत नाही. एक फोन केला असता तुम्ही… पैसे भरतो आम्ही, मी जालन्याला तीन लाख रुपये भरले. मी तुम्हाला बोलतो माझी काही जबाबदारी नाही का? अरे राजा, 35 वर्षे झाली मला राजकारणात आहे. आम्ही एक रुपयाची वीज चोरत नाही. जे चोरी करतात त्यांच्या मागे लागण्याची हिंमत आहे का? ते तुम्हाला तोडतील.

दादासाहेब काळे, इंजिनिअर – मीटर काढलं नाही, मी कालच येऊन गेलो.

आमदार बबनराव लोणीकर – नियमित पैसे मी भरतो. आम्ही कुणाचे पैसे बुडवले नाही.

दादासाहेब काळे, इंजिनिअर – सर, दोन वर्षे झाली. मी दोनदा-तिनदा येऊन गेलो.

आमदार बबनराव लोणीकर – कसले दोन वर्षे झाले, मी मागच्याच वर्षी साडेचार लाख रुपये भरले आम्ही.

लोणीकर – मागच्याच वर्षी साडेचार लाख रुपये भरले आम्ही

वीज अभियंता- यादव नावाने मीटर आहे ना ते?

लोणीकर – कुणीही तिथं राहत नाही तरीही पैसे भरले

वीज अभियंता- नाही नाही मीटर काढून नेलं नाही…

लोणीकर – आम्ही तिथं राहत नाही तरीही पैसे भरले…

लोणीकर – नीट वागा एवढीच सूचना आहे, बाकी काही नाही

वीज अभियंता- काढून नेलेलं नाही सर

लोणीकर – काचेची बांगडी आहे.. *&$%# लावू शकतो…सस्पेंड करु शकतो…तुम्हाला नीट करु शकतो…

वीज अभियंता- विनाकारण का बोलता मला हेच कळत नाही…

लोणीकर – का बोलता म्हणजे तू मीटर काढून नेलं आणि नाही कसं काय म्हणतो…

वीज अभियंता- मी मीटर काढून नेलं नाही

लोणीकर – उद्या येऊन बघा ना काढून नेलं का नाही?  तुमच्या कुणीतरी नालायक लोकांनी नेलं असेल तुम्हाला काय माहिती. राजाला दिवाळी काय माहिती तुम्हाला. आम्ही पैसे भरणारे लोक आहोत…सूड उगवू नका. आयकर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकीन. तुम्ही काय काय प्रॉपर्टी घेतली, कुठं कुठं पैसे कमावले. तुम्ही काय करता आम्ही कुंडल्या ठेवतो तुमच्या. आमच्या नादी लागू नका…आमच्या नादी लागायचं नाही. आम्हाला सांगा एक फोन करा आम्ही पैसे भरायला तयार असतो. आम्ही कधीही पैसे बुडवणारे लोक नाहीयेत, अशा आशयाचा ऑडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

BJP Attack on Kejriwal: दिल्लीत केजरीवालांच्या घरावर नेमका हल्ला कसा झाला? CCTV फुटेजनं भाजप युवा मोर्चाला उघडलं पाडलं, पाहा व्हिडीओ

Nana Patole : नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना करून दिली किमान समान कार्यक्रमाची आठवण, पत्रात नेमकं काय?

Congress MVA: ठाकरे सरकारवर संकट की काँग्रेसवरच? 25 आमदारांनी सोनियांच्या भेटीसाठी वेळ मागितली