Children Vaccination: उद्यापासून कोविन अ‍ॅपवर मुलांच्या लसीसाठी नोंदणी, औरंगाबादेत 2 लाख 13 हजार डोसचे उद्दिष्ट

| Updated on: Dec 31, 2021 | 11:27 AM

औरंगाबाद शहरातील सहा तर ग्रामीण भागातील दहा केंद्रांवर लसीकरण केले जाईल. शहरातील क्रांती चौक आरोग्य केंद्र, एमआयटी हॉस्पिटल, राजनगर आरोग्य केंद्र यासह आणखी तीन ठिकाणी ही लस दिली जाईल.

Children Vaccination: उद्यापासून कोविन अ‍ॅपवर मुलांच्या लसीसाठी नोंदणी, औरंगाबादेत 2 लाख 13 हजार डोसचे उद्दिष्ट
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः नवीन वर्षात 15 ते 18 वयोगटातील बालकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. 3 जानेवारीपासून हे लसीकरण सुरु होणार असून याकरिता 1 जानेवारीपासून कोविन अ‍ॅपवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच 10 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना तसेच फ्रंटलाइन वर्कर्सना तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिने झाले असतील तरच हा डोस दिला जाईल, असेही शासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

औरंगाबादमध्ये मुलांची लस कुठे?

औरंगाबाद शहरातील सहा तर ग्रामीण भागातील दहा केंद्रांवर लसीकरण केले जाईल. शहरातील क्रांती चौक आरोग्य केंद्र, एमआयटी हॉस्पिटल, राजनगर आरोग्य केंद्र यासह आणखी तीन ठिकाणी ही लस दिली जाईल. तसेच तीन ग्रामीण रुग्णालये आणि पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांसह दहा ठिकाणी लस दिली जाईल, अशी माहिती नोडल ऑफिसर महेश लड्डा यांनी दिली.

15 ते 18 वयोगटातील मुले किती?

राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60.63 लाख मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. यात नांदेड 1 लाख 81 हजार, जालना 1 लाख 9 हजार, लातूर 1 लाख 34 हजार, उस्मानाबाद 86 हजार, हिंगोली 65 हजार, बीड 1 लाख 42 हजार, परभणी 1 लाख1 हजार, नाशिक 3 लाख 43 हजार, मुंबई 6 लाख 12 हजार, पुणे 5 लाख 53 हजार अमरावती 49 हजार मुलांना डोस दिला जाईल. तर औरंगबााद जिल्ह्यात 2 लाख 13 हजार 823 मुलांचे लसीकरण केले जाईल.

इतर बातम्या-

Kharif Season : पावसाने नाही तर कशामुळे घटले राज्यात तुरीचे उत्पादनात? आता खरेदी केंद्राचाच आधार

Sanjay Raut | मुनगंटीवार म्हणाले शिवसेनेशी युती म्हणजे ऐतिहासिक चूक, आता संजय राऊतांनी दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…