Kharif Season : पावसाने नाही तर कशामुळे घटले राज्यात तुरीचे उत्पादनात? आता खरेदी केंद्राचाच आधार

पावसामुळे केवळ तुरीचे नुकसान झाले नसले तरी हे पीक अंतिम टप्प्यात असताना ढगाळ वातावरणामुळे मर रोग, शेंगा पोखरणारी अळी आणि पानाफुलांच्या जाळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाकडूनच स्पष्ट करण्यात आले आहे. तुरीचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. 5 महिने पीक जोपासून आता यामध्ये 20 टक्के घट झाल्याचा अंदाज प्रक्रिया उद्योगाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Kharif Season : पावसाने नाही तर कशामुळे घटले राज्यात तुरीचे उत्पादनात? आता खरेदी केंद्राचाच आधार
संग्रहीत छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 31, 2021 | 11:12 AM

पुणे : खरीप हंगामात (Kharif Season) दर पंधरा दिवसांनी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. याचा सर्वाधिक परिणाम हा सोयाबीन पिकावर झाला होता. तर उडीद, मूग, कापूस पिकाचेही नुकसान झाले होते. (Heavy Rain) पावसामुळे केवळ तुरीचे नुकसान झाले नसले तरी हे पीक अंतिम टप्प्यात असताना ढगाळ वातावरणामुळे मर रोग, शेंगा पोखरणारी अळी आणि पानाफुलांच्या जाळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाकडूनच स्पष्ट करण्यात आले आहे. तुरीचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. 5 महिने पीक जोपासून आता यामध्ये 20 टक्के घट झाल्याचा अंदाज प्रक्रिया उद्योगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वीच तुरीची मोठ्या प्रमाणात आवक केल्याने दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता खरेदी केंद्रावरील 6 हजार 300 रुपये या दराचाच आधार आता शेतकऱ्यांना आहे.

राज्यात 13 लाख हेक्टरावर तुरीचा पेरा

तूर हे खरीप हंगामातील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीन पाठोपाठ या पिकाच्या उत्पादतेकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. यंदाच्या हंगामात 13 लाख 35 हजार हेक्टरावर तुरीचा पेरा झाला होता. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा परिणाम या पिकावर झालेला नव्हता. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात असताना अंतिम टप्प्यात ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगराईचा प्रादुर्भावाने तुरीच्या शेंगा पोसल्याच नाहीत. मराठवाड्यातील एकूण लागवडी क्षेत्रापैकी 28 टक्के क्षेत्रावरील कीड-रोगराईचा प्रादुर्भाव झाला होता. धुक्यांमुळे फूलगळ झाली होती तर पाणथळ जमिनी, नदी-नाल्या काठच्या जमिनीत पाणी साचून राहिल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक झाला होता.

प्रक्रिया उद्योगावरही होणार परिणाम

खरीप हंगामातील सर्वच पिकांवर पावसाचा व बदलत्या वातावरणाचा परिणाम झालेला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील तूर उत्पादक क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले असून या दोन्ही राज्यातील उत्पादनात 20 टक्के घट झाली आहे. कर्नाटकातील गुलबर्गा, तलिकेट आणि बिदर या भागात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असताना यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

काय आहे कृषी विभागाचा अहवाल?

मराठवाड्यात सोयाबीन पाठोपाठ तुरीचे उत्पादन घेतले जाते. आंतरपिक म्हणून तुरीचाच पेरा केला जातो. यंदा मात्र, उस्मानाबाद, परभणी, बीड, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार हेक्टरावरील तुरीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. उत्पादनात घट झाल्याने दर वाढतील अशी आशा होती पण आतापर्यंत बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमीच दर मिळाला आहे. आता 1 जानेवारीपासून राज्यात खरेदी केंद्र सुरु होणार असून याचाच आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Red Chilly : नंदुरबारच्या बाजारपेठेत ‘तेजा’ मिरचीची ची तेजी, तब्बल 200 एकरात लाल मिरचीचे वाळवण

काय सांगता ? शेतीकामासाठी नाईट शिफ्ट अन् मजूरांना ओव्हरटाईमही देऊन, कशामुळे आली ही वेळ?

शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे महावितरणची बत्ती गुल, एका दिवसामध्ये कृषी पंपाचा प्रश्न मार्गी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें