चांगली बातमी: औरंगाबादेत जायकडवाडीत उभारणार तरंगता सौर प्रकल्प, मंत्री भागवत कराड यांची माहिती

| Updated on: Nov 11, 2021 | 6:19 PM

जायकवाडी वरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे 08 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी प्रत्यक्ष जमिनीची गरज नसेल. उलट या प्रकल्पातून तयार झालेल्या वीजेचा शेतकरी आणि उद्योगांना फायदा होईल.

चांगली बातमी: औरंगाबादेत जायकडवाडीत उभारणार तरंगता सौर प्रकल्प, मंत्री भागवत कराड यांची माहिती
जायकवाडी जलाशयावर तरंगता सौर प्रकल्प उभारण्याची योजना
Follow us on

औरंगाबादः वातावरण बदलाची मोठी समस्या सध्या जगाला भेडसावत असताना ग्रीन एनर्जी (Green Energy) निर्माण करण्यावर विविध देश भर देत आहेत. यात भारतानेही आणखी पुढाकार घेत औरंगाबादच्या प्रसिद्ध जायकवाडी धरणावर फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट उभारण्याची योजना आखली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेल्या जायकवाडी धरणावर (Jayakwadi Dam) तरंगणारा सौर प्रकल्प उभारण्याविषयी केंद्र आणि राज्यांतील संबंधित मंत्र्यांची लवकरच बैठक होईल, अशी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी औरंगाबादमध्ये बोलताना दिली.

अंदाजे 8 कोटी रुपये खर्च

जायकवाडी वरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे 08 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. चार एकर भागांतून 1 मेगावॅट वीजनिर्मिती होईल. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी प्रत्यक्ष जमिनीची गरज नसेल. उलट या प्रकल्पातून तयार झालेल्या वीजेचा शेतकरी आणि उद्योगांना फायदा होईल. यानुसार विचार केल्यास, शध्या 12 रुपये प्रति युनिट वीज विकत घ्यावी लागते. सौर ऊर्जा प्रकल्प तयार झाल्यानंतर ती 3 रुपये प्रति युनिटने मिलू शकेल. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना केवळ रात्रीच वीज उपलब्ध असते. मात्र या प्रकल्पामुळे दिवसादेखील वीज उपलब्ध होण्याची शक्यता, मंत्री महोदयांनी व्यक्त केली.

दोन हजार एकर भागावर प्रकल्पाची क्षमता

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी एका वृत्तपत्र कार्यालयाच्या भेटीदरम्यान याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, जगभर नैसर्गिक संपत्तीचे ज्वलन सुरु आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ऊर्जेबाबत योग्य नियोजन असले तर बरेच विषय निकाली निघतील. जायकवाडी धरणाच्या भव्यतेचा विचार करता याठिकाणी सुमारे दोन हजार एकर भागावर तरंगणारा सौरऊर्जा प्रकल्प उभारता येऊ शकतो. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्याशी या प्रकल्पाविषयी बोलणे झाल्याची माहितीही मंत्री डॉ. कराड यांनी दिली. तसेच महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशीदेखील दिल्लीत लवकरच या विषयावर बैठक होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

इतर बातम्या-

रेशन-पेट्रोल बंद झाल्यावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा, औरंगाबादेत आरोग्य केंद्रांवर गर्दी

Politics: औरंगाबादेत राजकीय गरमागरमी, शिवसेना-भाजपचे एकमेकांवर आरोप करत आंदोलन