AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Politics: औरंगाबादेत राजकीय गरमागरमी, शिवसेना-भाजपचे एकमेकांवर आरोप करत आंदोलन

शिवसेनेने महागाईच्या विरोधात आक्रोश मोर्चासाठी वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी यासाठी शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. तर भाजपने राज्यातील मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात निषेध व्यक्त करीत त्यांचा पुतळा जाळला.

Politics: औरंगाबादेत राजकीय गरमागरमी, शिवसेना-भाजपचे एकमेकांवर आरोप करत आंदोलन
औरंगाबादेत शिवसेना आणि भाजपची आंदोलनं
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 2:47 PM
Share

औरंगाबादः शहरातील महापालिका आणि औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूका (Aurangabad election) जवळ येऊ लागल्यात तसतसे शहरातील राजकीय वातावरणही (Politics) तापत आहे. शिवसेना आणि भाजप विविध मुद्द्यांवरून राजकारण करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने (Aurangabad Shiv Sena) महागाईच्या विरोधात आक्रोश मोर्चासाठी वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी यासाठी शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. तर भाजपने (BJP Activists) राज्यातील मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात निषेध व्यक्त करीत त्यांचा पुतळा जाळला.

शिवसेनेची महागाईविरोधात स्वाक्षरी मोहीम

शिवसेनेने पुंडलिकनगरमधील हनुमान चौक, मुकुंदवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तसेच शहरातील चारही मतदारसंघातील विविध भागांमध्ये महागाईबाबत स्वाक्षरी मोहीम राबवली. 13 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांच्या नेतृत्वात महागाईविरोधात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विजय वाघचौरे, मनोज गांगवे आदींनी मोहिमेत भाग घेतला.

भाजपने जाळला नवाब मलिक यांचा पुतळा

शिवसेनेने केंद्र सरकारमधील भाजपविरोधात हे आंदोलन केले तर इकडे भाजपनेही औरंगाबादेत नवाब मलिक यांच्याविरोधात निदर्शनं केली. मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे वक्तव्य केले. त्याचा निषेध करीत भाजप युवा मोर्चाने बुधावरी दुपारी क्रांती चौकात निदर्शने करीत मलिका यांचा पुतळा जाळला.

इतर बातम्या-

औरंगाबादः विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संजय केणेकरांना उमेदवारी, 29 नोव्हेंबर रोजी होणार मतदान

मोठी बातमीः औरंगाबादमध्ये ईडीचे धाडसत्र, दोन उद्योजक निशाण्यावर, सात ठिकाणी छापे

औरंगाबादः 8 वर्षीय मुलीच्या आत्महत्येचे गूढ उकलले, पत्नी नांदायला येत नाही म्हणून बापानेच केली हत्या!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.