AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona updates: औरंगाबादेत 658 कोरोना रुग्णांची नोंद, मराठवाड्यातील आकडेवारी काय?

संपूर्ण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा विचार करता रविवारी 2 हजार 523 कोरोना बाधित आढळले. तर रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. सर्वाधिक रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आले.

Corona updates: औरंगाबादेत 658 कोरोना रुग्णांची नोंद, मराठवाड्यातील आकडेवारी काय?
Corona
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 17, 2022 | 9:37 AM
Share

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 658 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात एकट्या औरंगाबाद शहरात 519 रुग्णांची भर पडलेली दिसून आली तर ग्रामीण भागातील रुग्णांचा आकडा 139 एवढा नोंदवला गेला. दिवसभरात औरंगाबादेत जवळफास दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.

90 टक्के रुग्णांवर घरीच उपचार

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरीही या आजाराची गंभीर लक्षण दिसत नसल्याने रुग्ण घरच्या घरीच खासगी दवाखान्यांमध्ये दाखवून उपचार घेत आहेत. जवळपास 90 टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. तरीही पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना त्यांच्या संपर्कातील नागरिकांची स्वतःहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मनपाकडून करण्यात येत आहे. यानंतरही अनेक जण तपासणीसाठी येतच नसून खासगी डॉक्टरांमार्फतच उपचार घेत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

औरंगाबादमधील तालुकानिहाय रुग्ण

औरंगाबाद- 65 फुलंब्री- 5 गंगापूर- 43 कन्नड- 4 खुलताबाद- 2 सिल्लोड- 2 वैजापूर-8 पैठण- 10

मराठवाड्यातील रविवारची आकडेवारी

संपूर्ण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा विचार करता रविवारी 2 हजार 523 कोरोना बाधित आढळले. तर रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. सर्वाधिक रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आले. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीतदेखील औरंगाबादच पुढे आहे. येथे 3 हजार 614 रुग्ण उपचार घेत आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये रविवारी आढळून आलेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे- नांदेड- 643 लातूर- 543 उस्मानाबाद- 194 जालना- 185 बीड- 125 परभणी- 101 हिंगोली- 74

इतर बातम्या-

Amravati |अमरावतीमधील दर्यापूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

Paush Purnima 2022 | जाणून घ्या पौष पौर्णिमेचे महत्व, पूजा विधी आणि मुहूर्त

Follow Us
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?