Aurangabad Crime: पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत देशी दारूचा अड्डा, औरंगाबादेत सहा जणांना बेड्या!

| Updated on: Dec 29, 2021 | 10:17 AM

औरंगबााद तालुक्यातील आडगाव (बु.) येथील जय जवान सैनिक, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत बनावट देशी दारूचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. येथून सहा जणांना अटक करण्यात आली.

Aurangabad Crime: पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत देशी दारूचा अड्डा, औरंगाबादेत सहा जणांना बेड्या!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः पोलीस भरती प्रक्रियेतील परीक्षांमधील घोटाळे उघड झाल्यानंतर आता ठिकठिकाणच्या भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थांवर करडी नजर ठेवली जातेय. औरंगबाादमधील एका प्रशिक्षण संस्थेतील आणखी एक गैरप्रकार मंगळवारी उघडकीस आला. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत बनावट देशी दारूचा अड्डा चालवणाऱ्या सहा जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

औरंगबााद तालुक्यातील आडगाव (बु.) येथील जय जवान सैनिक, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने छापा टाकून बनावट देशी दारूच्या 7,132 बाटल्या, चार बॉटलिंग मशीन, बनावट बूच, लेबल्स खोके, 200 लीटरच्या सहा बाटल्या, मोटर, चारचाकी वाहन असा सुमारे 19 लाख सात हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

6 जणांना कोठडी

मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत जय जवान सैनिक पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेचा संस्थाचलक अशोक किसन डवले याला अटक करण्यात आली. त्याच्यासह विकी जयंतकुमार राघाणी, अमोल कारभारी, अमोल चव्हाण , शेख वसीम, राकेश यादव यांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेदवार देणार, भाई जगताप यांचा पुनरुच्चार

Election: मराठवाड्यात 45 नगरपरिषदांवर प्रशासकाची नियुक्ती होणार, तीन महिन्यात कोणत्या पंचायतींची मुदत संपणार?