ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार?, फडणवीसांनी राऊतांना डिवचलं

| Updated on: Oct 04, 2021 | 10:18 AM

अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. (devendra fadnavis reply to sanjay raut over saamana editorial)

ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार?, फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
devendra fadnavis
Follow us on

लातूर: अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हे कागदावरचे नेते आहेत. ऑफिसच्या एसीत बसून मोठे झालेले हे लीडर आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना डिवचले आहे.

देवेंद्र फडणवीस आज लातूरमध्ये आहेत. लातूरमधील पूरपरिस्थितीची ते पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. जे लोक ऑफिसमध्ये बसून टीका करतात. अग्रलेख लिहून नेते होतात. त्यांना शेतकऱ्यांचा दुःख काय माहीत? हे ऑफिसमधले लीडर आहेत. हे कागदावरचे लीडर आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचं, असं फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना आवाहन

राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतरही एकाही मंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली नाही. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सीएम सोडाच पालकमंत्र्यांनीही पाहणी दौरा केला नाही. सीएम यांनी तात्काळ दौरा केला पाहिजे. हे सरकार विदर्भ, मराठवाडा विरोधी सरकार आहे, असा आरोप करतानाच पीकविमा सरकारची जबाबदारी आहे. कंपनीवर दबाव वाढवत शेतकऱ्यांना सरकारनेच दिलासा दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

सत्तेत नसल्याची खंत वाटते

राज्यात अतिवृष्टी आहेत. सरकार मदत करत नाही. शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशावेळी तुम्ही सत्तेत नाही, याची खंत वाटते का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर आम्हाला खंत वाटते, पण आम्ही मात्र आम्ही विरोधीपक्षाची भूमिका चोख बजावू, असं त्यांनी सांगितलं.

निकषाबाहेर जाऊन मदत करा

दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मांजरा धरणारे दरवाजे योग्य पद्धतीनं उघडले गेले होते का? असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे. आम्ही केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत केली होती. राज्य सरकारनं आही मदत द्यावी त्यानंतर केंद्राकडून पैसे घ्यावेत, असंही त्यांनी सांगितलं.

जलयुक्त शिवारावर राजकीय भाष्य नको

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. तो सरकारनं समजून घ्यावा. सरकार जर तातडीने मदत करणार नसेल तर आमचे एक आमदार कोर्टात गेले आहेत. आम्हाला अंगावर तर जावंच लागेल ना, असा संतापही फडणवीसांनी व्यक्त केलाय. जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. जलयुक्तबद्दल राजकीय भाष्य नको. ज्यांनी दिलं ते कुणाच्या दबावाखाली दिले ते बघावं लागेल, असंही फडणवीस म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

मांजरा धरणात इतकं पाणी का सोडलं, चौकशी करा : देवेंद्र फडणवीस

Priyanka Gandhi : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी उ. प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

एकनाथ खडसे यांचा पाय आणखी खोलात, आता महिला आयोग अॅक्शन मोडमध्ये

(devendra fadnavis reply to sanjay raut over saamana editorial)