AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राची आद्य मराठी कोणती? मराठवाडी हीच मूळ मराठी? वाचा इतिहास काय सांगतो?

औरंगाबाद:  संपूर्ण भारत देशातून इंग्रजांची राजवट 15 ऑगस्ट 1947 रोजी संपुष्टात आली. अवघा देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून (Freedom From Britishers) स्वतंत्र झाला. पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरला गेला होता. त्यावेळी 565 पैकी 562 संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली. पण हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर तसेच जुनागड संस्थान (Hauderabad, Jammu-Kashmir and Junagad) या […]

महाराष्ट्राची आद्य मराठी कोणती? मराठवाडी हीच मूळ मराठी? वाचा इतिहास काय सांगतो?
सातवाहन काळात पहिल्या शतकात भारतभर विविध प्राकृत भाषा बोलल्या जायच्या त्यावेळी प्रतिष्ठान नगरी (आजचे पैठण ) राजधानी असलेल्या या प्रदेशात महाराष्ट्री प्राकृत बोलली जायची नव्हे ती त्यांची राजभाषा होती… एवढेच नव्हे तर पहिला गुनाढ्य कृत लिखित ग्रंथ बृहद्कथा हाही प्राकृत मराठीत लिहला गेला.
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 1:13 PM
Share

औरंगाबाद:  संपूर्ण भारत देशातून इंग्रजांची राजवट 15 ऑगस्ट 1947 रोजी संपुष्टात आली. अवघा देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून (Freedom From Britishers) स्वतंत्र झाला. पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरला गेला होता. त्यावेळी 565 पैकी 562 संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली. पण हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर तसेच जुनागड संस्थान (Hauderabad, Jammu-Kashmir and Junagad) या तीन संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्यास नकार दिला. त्यावेळच्या हैदराबाद संस्थान संस्थानाता तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा भाग येत होता. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांना यासाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागला. निजाम शासनाविरोधात पोलीस कारवाई करत हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतदेशात सामावून घेतले गेले ते 1948 मध्ये. याच दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामाच्या दडपशाहीतून मुक्त झाले. हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन (Marathwada Liberation Day) म्हणून साजरा केला जातो. पुढे अनेक प्रशासकीय प्रक्रिया घडल्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यात जोडण्यात आला आणि 1 मे 1960 पासून तो नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला.

असंख्य स्वातंत्र्यसैनिकांची आहुती

मराठवाड्यातील स्वातंत्र्ययुद्धाचे लोण गावागावात पसरवले गेले. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. स्वामी रामानंदतीर्थ,गोविंदभाई श्रॉफ हे हैदराबाद मुक्तीसंग्रामचे अर्ध्वयू होते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या बरोबरीने गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि यांच्यासोबतच अनेक स्वातंत्रयोद्ध्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत मोलाचे कार्य केले.

स्वातंत्र्यानंतरही सलग 13 महिन्यांचा लढा

भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी निजाम तयार होत नव्हता. त्याने नागरिकांवर अतोनात अत्याचार सुरु केल्याने पोलीस ॲक्शन सुरु झाले. भारतीय फौजांनी हैद्राबाद संस्थांनावर चारी बाजूंनी हल्ले सुरु केल्याने निजामास सैन्य माघार घेण्यास भाग पाडले. हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी 17 सप्टेंबर, 1948 रोजी शरणांगती स्वीकारल्याने खुद्द निजाम शरण आला. अशा प्रकारे मराठवाडा मुक्तीसंग्रामचे हे आंदोलन सतत 13 महिने लढले गेले.

पहिला प्राकृत मराठीतील ग्रंथ मराठवाड्यातच लिहिला गेला

मराठवाडा हा मराठी भाषकांचा आद्यप्रांत आहे. सातवाहन काळात पहिल्या शतकात भारतभर विविध प्राकृत भाषा बोलल्या जायच्या त्यावेळी प्रतिष्ठान नगरी (आजचे पैठण ) राजधानी असलेल्या या प्रदेशात महाराष्ट्री प्राकृत बोलली जायची नव्हे ती त्यांची राजभाषा होती… एवढेच नव्हे तर पहिला गुनाढ्य कृत लिखित ग्रंथ बृहद्कथा हाही प्राकृत मराठीत लिहला गेला. गोदावरी आणि मन्याड खोरं बालाघाट डोंगर रांगाच्या आसपासचा कमी पाण्याचा पण सुपीक प्रदेश त्यामुळे तगेर ( तेर- ढोकी ) इथं सापडलेल्या प्राचीन अवशेषावरून हा प्रदेश ग्रीक रोमांबरोबर व्यापारी संबंध ठेवून होता याचे पुरावे पुरातत्व तज्ञाकडे आहेत. या अशा सुपीक प्रदेशावर अनेक राजांनी राज्य केले. त्याच्या तुरळक खुणा आज पर्यंत संशोधकांच्या नजरेत आल्या. अजूनही डोळस संशोधन होणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी त्यांच्या लेखात या पैलूवर प्रकाशझोत टाकला आहे.

शैक्षणिकदृष्ट्या मराठवाड्याची पिछेहाट का झाली?

१९०३ मध्ये सीपी ऐंड बेरारच्या विभाजना नंतर देशातील इतर भागासारखी मराठवाड्याची शैक्षणिक प्रगती झाली नाही. साम्राज्य विस्तारक आणि आधुनिक जगाच्या विकासाची ओळख करुन देणाऱ्या ब्रिटीशांनी मराठवाडा वगळून भारत भर मिशनरीज शाळा सुरु केल्या. इंग्रजी सारखी जगाची ओळख करुन देणारी भाषा अवगत करुन दिली. तो अनुशेष 1948 नंतर अनेक प्रागतीक विचारांच्या लोकांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला यश आलं. शिक्षणासारखं मूलभूत परिवर्तनाचं माध्यम लोक चळवळ म्हणून पुढे आलं. त्यामुळे पुढच्या काळात महाराष्ट्राला अनेक बुद्धीजिवी व्यक्ती या भूमीने दिले. ह्या भूमीने मराठी माणसात अमूलाग्र बदल घडविणाऱ्या भागवत संप्रदायाचा पाया घातला…या सुपीक जमिनीत पावसाच्या अल्प प्रमाणामुळे म्हणावं तेवढं पीक आलं नसेल पण मेंदू सुपीक असल्यामुळे अनेक मानवी विकासाच्या चळवळी या भूमीत निर्माण झाल्या. मानवी विकासात नेहमीच प्रागतिक असलेल्या या प्रदेशात भौगोलिक स्थितीमुळे भौतिक विकास तुलनेनी कमी झाला पण इथल्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाने या भौगोलिक स्थितीवर मात करणारे प्रकल्प राबविले. आताही राबविले जात आहेत.

इतर बातम्या- 

74 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळ्यासाठी औरंगाबाद सज्ज, पोलिसांचे संचलन, उद्या सकाळी 9 वाजता ध्वजारोहण

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.