सोनं नाही, चांदी नाही… इथं तर आरोग्य केंद्रच गहाण टाकलंय, हिंगोली प्रशासन हादरलं, काय आहे नेमकं प्रकरण?

| Updated on: Feb 20, 2022 | 4:57 PM

एरवी शेतककऱ्याला कर्जासाठी बँकेच्या फेऱ्या कराव्या लागतात. मात्र या प्रकरणात बँकेकडूनही निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले आहे. या कर्जाची परतफेड झाली नाही तर बँक प्रशासन हे आरोग्य केंद्र जप्त कऱणार का असा प्रश्न आता विचारला जात आहे.

सोनं नाही, चांदी नाही... इथं तर आरोग्य केंद्रच गहाण टाकलंय, हिंगोली प्रशासन हादरलं, काय आहे नेमकं प्रकरण?
Follow us on

हिंगोलीः कर्ज घेण्यासाठी आपण सोनं, चांदी, दुचाकी, चार चाकी, घरही गहाण टाकल्याचं ऐकलेलं आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रच गहाण टाकण्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीत (Hingoli) उघडकीस आला आहे. येथील एका शेतकऱ्याने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (Bank of India) प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) असलेल्या जागेचा सातबाराच्या आधारे पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले. 5 लाख रुपये कर्ज घेऊन आरोग्य केंद्राच्या सातबारासह इमारतही गहाण ठेवण्यात आली.. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हिंगोली प्रशासनही हादरल आहे. विशेष म्हणजे, या प्रकार उघडकीस आल्यानंतरही शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकारासाठी आरोग्य प्रशासन जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

हिंगोली हे परभणी जिल्ह्यात असताना 1978 साली हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते. तीन एकर शेतजमिनीवर आरोग्य केंद्रीच उभारणी करण्यात आली होती. तत्कालीन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री रजनीताई सातव यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं. या आरोग्य केंद्रात डोंगरकडासह इतर 10-12 गावांना आरोग्य सेवा पुरवली जाते. परंतु आता ह्या आरोग्य केंद्राचा संपूर्ण सातबारा डोंगरकडा येथील स्टेट बँक ऑप इंडिया शाखा येथे गहाण आहे. या आरोग्य केंद्राची उभारणी करत असताना कागदोपत्री पूर्तता न करता करण्यात आलेली नाही. आरोग्य केंद्राची जमीन मूळ मालकाच्याच नावावर राहिली. आरोग्य प्रशासानाच्या दुर्लभाचा फायदा घेऊन शेतकऱ्याने बँकेतून कर्ज घेतले.

महसूल विभाग करणार चौकशी

शंकरराव बळवंतराव देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सद्या ज्या शेतकऱ्याच्या नावावर आरोग्य केंद्राचा सातबारा आहे, त्याने ही जमीन गहाण ठेवली आहे. शेतकऱ्याने हा सातबारा बँकेकडे गहाण ठेवला आहे. सातबाराची सर्व संकलित माहिती महसूल विभागाकडे असते. जमिनीवर आरोग्य केंद्र उबारले असले तरी सातबारा शेतकऱ्याच्याच नावे आहे. याचा फायदा उचलून कर्ज घेण्यात आले. याप्रकरणी महसूल विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. एरवी शेतककऱ्याला कर्जासाठी बँकेच्या फेऱ्या कराव्या लागतात. मात्र या प्रकरणात बँकेकडूनही निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले आहे. या कर्जाची परतफेड झाली नाही तर बँक प्रशासन हे आरोग्य केंद्र जप्त कऱणार का असा प्रश्न आता विचारला जात आहे.

इतर बातम्या-

Baramati| बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र वीर जवान अशोक इंगवले यांच्या निधनाने त्यांच्या घरावर मोठे संकट

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा देण्याची मागणी; सुभाष देसाई उद्या केंद्रीय मंत्र्यांना भेटणार