सोने निघाले पन्नाशीकडे, बाजारात उत्सवी वातावरण, वाचा औरंगाबादचे भाव

| Updated on: Oct 24, 2021 | 7:09 PM

मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरांनी वाढीच्या दिशेने आलेख दर्शवला आहे. आज रविवारी 24 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 49,750 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 45,770 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले.

सोने निघाले पन्नाशीकडे, बाजारात उत्सवी वातावरण, वाचा औरंगाबादचे भाव
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

औरंगाबादः दिवाळी आणि त्यानंतर येणाऱ्या लग्नसराईच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये विविध सराफ्यांच्या (Aurangabad Market) दुकानात ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. ग्राहकांचा एकूण कल पाहता ओरिजनल सोन्याऐवजी (Investment in gold) सुबक डिझाइनच्या दागिने खरेदीला जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान दिवाळीचा सण जसा जवळ येतोय, तसे सोन्याचे भाव (Gold Price) वाढताना दिसत आहेत. औरंगाबादमध्येही सोन्याने आता 49 हजार रुपयांची पातळी ओलांडल्याचे चित्र आहे.

औरंगाबादेत सोने पन्नाशीच्या दिशेने

मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरांनी वाढीच्या दिशेने आलेख दर्शवला आहे. आज रविवारी 24 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 49,750 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 45,770 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. सोन्याच्या दरात जीएसटीचा समावेश आहे. 22 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 47000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा एवढे होते. 21 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमधील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 47300 रुपये प्रति तोळा एवढा नोंदला गेला. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 48,500 रुपये प्रति तोळा एवढा नोंदला गेला. त्यामुळे दिवाळी जसजशी जवळ येतेय, तशी सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे, ही माहिती सराफा व्यापारी दत्ता सावंत यांनी दिली.

चांदीच्या दरात घसरण

रविवारी 24 ऑक्टोबर रोजी औरंगाबादच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात मागील दोन दिवसांच्या तुलनेत 1000 रुपयांची घसरण पहायला मिळाली. आज एक किलो शुद्ध चांदीचा दर 66,500 रुपये एवढा नोंदला गेला. 22 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव 67,500 रुपये प्रति किलो एवढा नोंदला गेला.

ओरिजनलऐवजी फँन्सी दागिन्यांना पसंती

भारतीय परंपरेनुसार, सोन्याकडे गुंतवणुकीचे माध्यम म्हणून पाहिले जाते. त्यामुळे सणासुदीत शुद्ध सोन्याचे वेढ किंवा मणी घेण्याची प्रथा आहे. आता मात्र बहुतांश ग्राहक ओरिजनल सोन्यासोबतच विविध डिझाइनच्या दागिन्यांना पसंती देताना दिसत आहेत. किंबहुना काही व्यापाऱ्यांच्या मते, ग्राहक हल्ली फँसी दागिने, हिऱ्यांचे दागिने यांनाच जास्त पसंती देत आहेत, अशी माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली.

गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचा व्यापार आता ईजीआरद्वारे

गोल्ड एक्सचेंजमध्ये आता सोन्याचा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (पावती) अर्थात ईजीआरद्वारे केला जाईल. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजमधून सुरू केली जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच हे ठरवले जाईल की, ईजीआरची किमान किंमत किती असेल. यानंतर शेअर बाजार EGR चे सोन्यात रूपांतर करू शकतील. सेबीच्या मते, गोल्ड एक्स्चेंजमध्ये EGR च्या ट्रेडिंग आणि फिजिकल सोन्याच्या डिलिव्हरीसाठी संपूर्ण इको-सिस्टम असेल आणि देशातील सोन्याच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता आणि निवड प्रदान करेल. ईजीआरच्या खरेदी आणि विक्रीसाठी गोल्ड एक्सचेंज हे राष्ट्रीय व्यासपीठ असेल. ईजीआरअंतर्गत मानक सोन्याचा व्यापार केला जाईल आणि देशभरात सोन्याची एकसमान किंमत रचना तयार करण्यात मदत होईल.

इतर बातम्या-

सोन्याची चढती कमान; जाणून घ्या नाशिक सराफातले भावसोन्याच्या दरात पुन्हा घट, दिवाळीपर्यंत वाढण्याची शक्यता, वाचा औरंगाबादचे भाव