सोन्यात गुंतवणुकीची मोठी संधी; ‘या’ दिवसापासून सरकार सॉवरेन गोल्ड बाँड विकणार

वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 2021-22 च्या सीरिज 8 साठी सबस्क्रिप्शन कालावधी 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत असेल आणि 2 नोव्हेंबर रोजी बाँड जारी केले जातील. हे बाँड बँका (लघु वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIS), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज (नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया आणि बॉम्बे) जारी करतात.

सोन्यात गुंतवणुकीची मोठी संधी; 'या' दिवसापासून सरकार सॉवरेन गोल्ड बाँड विकणार

नवी दिल्लीः 25 ऑक्टोबरपासून पाच दिवसांसाठी 2021-22 च्या पुढील हप्त्यात सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) मध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते, असे वित्त मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. 2021-22 गोल्ड बाँडच्या मालिकेअंतर्गत ऑक्टोबर 2021 आणि मार्च 2022 दरम्यान चार टप्प्यांत बॉण्ड जारी केले जातील. या मालिकेअंतर्गत मे 2021 ते सप्टेंबर 2021 पर्यंत सहा टप्प्यांत बाँड जारी करण्यात आलेत.

2 नोव्हेंबरला बाँड जारी केले जातील

वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 2021-22 च्या सीरिज 8 साठी सबस्क्रिप्शन कालावधी 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत असेल आणि 2 नोव्हेंबर रोजी बाँड जारी केले जातील. हे बाँड बँका (लघु वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIS), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज (नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया आणि बॉम्बे) जारी करतात.

बाँडची मुदत 8 वर्षांसाठी असेल

हे बाँड भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे जारी केले जातील. यासाठी सोन्याची किंमत बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशन ऑफ इंडिया लिमिटेडने सदस्यता कालावधीच्या आधीच्या आठवड्याच्या शेवटच्या तीन कामकाजाच्या दिवसांसाठी प्रकाशित केलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या बंद किमतीच्या सरासरीच्या बरोबरीची असेल. बाँडचा कार्यकाळ आठ वर्षांसाठी असेल आणि पाचव्या वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्याय देखील असेल. मंत्रालयाने म्हटले आहे की, गुंतवणूकदारांना ऑनलाईन अर्ज आणि डिजिटल पद्धतीने केलेल्या पेमेंटवर प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट दिली जाईल आणि या योजनेत गुंतवणूक केल्यावर व्याजाच्या स्वरूपात अतिरिक्त परतावा देखील मिळेल. या योजनेत किमान एक ग्रॅम सोने गुंतवले जाऊ शकते.

सॉवरेन गोल्ड बाँड म्हणजे काय?

तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँडद्वारे सोन्यात गुंतवणूक करू शकता. परताव्याच्या दृष्टीने ते अधिक चांगले मानले जाते. तज्ज्ञ असेही म्हणतात की, भौतिक सोन्यापेक्षा सार्वभौम सुवर्ण बाँड सुरक्षित आहेत. जर शुद्धतेबद्दल बोलायचे झाले तर सार्वभौम सोने आभासी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात राहते, त्यामुळे त्याच्या शुद्धतेवर शंका घेण्यास जागा नाही.

संबंधित बातम्या

कॅबिनेटची पंतप्रधान गती शक्ती योजनेला मंजुरी, सरकारचा मास्टर प्लॅन काय?

Aadhar Card Update: आधार कार्डमध्ये फोटो चांगला दिसत नाही, असा करा अपडेट, संपूर्ण प्रक्रिया काय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI