औरंगाबादच्या बाजारात परराज्यातील लाल मातीच्या आकर्षक पणत्या दाखल, स्थानिकांचा लक्ष्मी मूर्ती बनवण्यावर भर

शहरातील पणत्यांच्या बाजारात गेल्या काही वर्षांपासून इतर राज्यांतील पणत्यांचीही आवक होते. लाल मातीपासून बनवलेल्या असल्याने त्याचा रंग लाल आणि चिकणमाती असल्याने आकर्षक दिसतात. त्यावर सुंदर डिझाइन केलेली असते.

औरंगाबादच्या बाजारात परराज्यातील लाल मातीच्या आकर्षक पणत्या दाखल, स्थानिकांचा लक्ष्मी मूर्ती बनवण्यावर भर
परराज्यातील आकर्षक लाल पणत्यांची औरंगबादच्या बाजारात आवक

औरंगाबादः दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी. वीजेचे बल्ब असले तरीही दिवाळीला प्रत्येकाच्या अंगणाची शोभा पणत्यांनी वाढवली जाते. प्रत्येकाच्या अंगणात दिव्यांची आरास (Diyaa Decoration) केली जाते. दिव्यांच्या या सणासाठी शहरातील कारागीर दोन ते तीन महिने आधीपासूनच पणत्या तयार करायला घेतात. मात्र यंदा औरंगाबादच्या बाजारात (Aurangabad market) परराज्यातून आलेल्या पणत्या जास्त दिसून येत आहे. त्यामुळे पारंपरिक व्यावसायिकांवर 20 टक्के परिणाम झाला असल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे मत आहे. त्यामुळे आता स्थानिक मूर्तिकार (Local) लक्ष्मी, घोडा-गवळण, बोळकी बनवण्यावर भर देत आहेत.

राजस्थान, उत्तर प्रदेशातून पणत्यांची आवक

शहरातील पणत्यांच्या बाजारात गेल्या काही वर्षांपासून इतर राज्यांतील पणत्यांचीही आवक होते. लाल मातीपासून बनवलेल्या असल्याने त्याचा रंग लाल आणि चिकणमाती असल्याने आकर्षक दिसतात. त्यावर सुंदर डिझाइन केलेली असते. राजस्थान, उत्तर प्रदेश या भागातून शहरात दिवाळीनिमित्त ६ लाखांहून अधिक पणत्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. औरंगपुरा, सेव्हन हिल्स, सिडको-हडको, जळगाव रोड या भागात परराज्यांतील नागरिक व्यवसाय करत आहेत. याचा परिणाम कुंभारवाड्यातील पारंपरिक पणत्या तयार करणाऱ्यांवर झाला आहे. आजमितीला काळ्या मातीपासून बनवण्यात येणाऱ्या पणत्यांची निर्मिती ठप्प झाली आहे.

स्थानिकांचा भर मूर्तिकामावर

चिकलठाणा भागातील मोरया आर्ट‌्सचे मूर्ती कारागीर किशोर गोरखोदे म्हणाले, परराज्यातील पणत्यांमुळे स्थानिक कारागिरांनी पणत्या बनवणे बंद केले आहे. दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनासाठी कुबेरलक्ष्मी, धनलक्ष्मी अशा एक हजार मूर्ती तयार केल्या. यात 6 इंचांपासून ते 1 फुटापर्यंत मूर्ती असून होलसेलच्या दरात 60 रुपयांपासून130 रुपयांपर्यंत विक्री होते. अडीच हजारांना एक हजार बोळकी विक्री होत आहेत. मागील वर्षी 500 मूर्ती तयार केल्या होत्या. या वर्षी बाजारपेठ खुली झाल्याने एक हजार मूर्ती बनवल्या आहेत. पूर्वी 1 लाख पणत्या,1 लाख बोळकी बनवली जात; परंतु परराज्यातून पणत्या येत असल्याने त्या बनवणे बंद झाल्याने 20 टक्के नुकसान होत आहे.

इतर बातम्या-

औरंगाबाद विमानतळावरही खासगीकरणाचे वारे, सोयी- सुविधा, प्रवासी संख्येची सविस्तर माहिती मागवली

सिडको वाळूज महानगराचे औरंगाबाद महापालिका हस्तांतरण कामाला वेग, सुविधांचे होणार संयुक्त सर्वेक्षण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI