AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jijamata Jayanti: औरंगाबादमधील पहिल्या जिजाऊ स्मारकाचे आज उद्घाटन, नियम पाळून दर्शन घेण्याचे आवाहन!

नारायण नगरातील नागरिकांनी येथील पडीक जागेवरच सुंदर उद्यान फुलवले आहे. लोकसहभागातून या उद्यानात राजमाता जिजाऊ स्मारक उभारण्यात आले. शहरातील जिजामातांचे हे पहिलेच स्मारक आहे.

Jijamata Jayanti: औरंगाबादमधील पहिल्या जिजाऊ स्मारकाचे आज उद्घाटन, नियम पाळून दर्शन घेण्याचे आवाहन!
सातारा परिसरातील नारायण नगर येथील जिजाऊंचे स्मारक
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 7:00 AM
Share

औरंगाबादः छत्रपती शिवरायांच्या माता जिजाऊ (Jijamata jayanti) यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी औरंगाबादमधील पहिल्या जिजाऊ स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे सातारा परिसरातील नारायण नगरातील नागरिकांनी लोकसहभागातून  जिजाऊ उद्यानाची निर्मिती केली आहे. तसेच येथे राजमाता जिजाऊंचे पहिले स्मारकही उभारले आहे. आज जिजाऊ जयंतीनिमित्त कोरोनाचे सर्व नियम पाळून नागरिकांनी या स्मारकाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन जिजामाता उद्यान समितीतर्फे करण्यात आले आहे.

लोकसहभागातून फुलवले उद्यान

नारायण नगरातील नागरिकांनी येथील पडीक जागेवरच सुंदर उद्यान फुलवले आहे. जागेची आधी स्वच्छता करण्यात आली. चहुबाजूंनी वृक्ष लावून तिला उद्यानाचे स्वरुप दिले. पशु पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मुलांना खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ तसेच इतर नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. लोकसहभागातून या उद्यानात राजमाता जिजाऊ स्मारक उभारण्यात आले.

उत्सव साधेपणाने साजरा करा- डॉ. पुरुषोत्तम खेडेकर

12 जानेवारी या दिवशी राजमाता जिजाऊंचा जन्मसोहळा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र कोरोना संकटामुळे यावेळी उत्सवावर निर्बंध आले आहेत. दरवर्षी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे 5 लाखांवर मावळे येतात. मात्र नागरिकांनी घरच्या घरीच उत्सव साजरा करावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. सिंदखेडराजा येथे 50 जणांच्या मोजक्याच उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल, नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Goa Election 2022: गोव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार का? पवार म्हणाले, तर आम्हाला समाधान !

शरद पवारांनी कोणत्या अधिकारात एसटीबाबत बैठक घेतली? भाजपच्या प्रश्नाला आता पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.