Video : औरंगाबादमध्ये शेतकरी कुटुंबाला 10 ते 12 गावगुंडांकडून बेदम मारहाण

औरंगाबादमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील बाभूळगावात शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाली आहे. गावातील 10 ते 12 गुंडांकडून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Video : औरंगाबादमध्ये शेतकरी कुटुंबाला 10 ते 12 गावगुंडांकडून बेदम मारहाण
10 ते 12 गावगुंडांकडून शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मारहाण
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 10:10 AM

औरंगाबाद : औरंगाबादमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील बाभूळगावात शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाली आहे. गावातील 10 ते 12 गुंडांकडून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

गावगुडांनी शेतकरी कुटुंबाला केल्ल्या मारहाणीत शेतकरी काकासाहेब तुपे गंभीर जखमी झाले आहेत. काही महिलांना देखील मारहाण झाल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. काही व्यक्तींना रक्तबंबाळ होईपर्यंत मारण्यात करण्यात आली आहे.

मारहाण प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील शिरुर पोलीस ठाण्यात 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 7 ते 8 विविध कलमांन्वये आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

व्हिडीओ पाहा :

(maharashtra Aurabgabad Goons beaten up Farmer Family Fir File police)

हे ही वाचा :

डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढल्यावर महापालिका सक्रीय, विविध झोनमध्ये स्वच्छता व औषध फवारणीसाठी विशेष मोहिम

सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, ‘आमचा खड्डेमय रस्ता बांधणाऱ्या इंजिनिअरला सोडून इतर सर्वांना इंजिनिअर्स डे च्या शुभेच्छा’