सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, ‘आमचा खड्डेमय रस्ता बांधणाऱ्या इंजिनिअरला सोडून इतर सर्वांना इंजिनिअर्स डे च्या शुभेच्छा’

आजही राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त नागरिकांचा रोष उपरोधिक पद्धतीने समाज माध्यमांवर व्यक्त झालेला दिसतोय. औरंगाबाद शहरातील नागरिकांनीही शहरातील रस्ते बांधकाम करणाऱ्या इंजिनिअर्सना सोडून इतर सर्व इंजिनिअर्सला शुभेच्छा दिल्यात.

सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, 'आमचा खड्डेमय रस्ता बांधणाऱ्या इंजिनिअरला सोडून इतर सर्वांना इंजिनिअर्स डे च्या शुभेच्छा'

औरंगाबाद: सामान्य माणसांचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे सोशल मीडिया. दररोज ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यांसाठी दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न असतो, तेव्हा नागरिकांना आधी सोशल मीडियाचं द्वार खुणावतं. त्यामुळे सामान्य नागरिक आपापल्या समस्या नेहमीच सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत असतात. आजही राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त नागरिकांचा रोष उपरोधिक पद्धतीने समाज माध्यमांवर व्यक्त झालेला दिसतोय. औरंगाबाद शहरातील नागरिकांनीही शहरातील रस्ते बांधकाम करणाऱ्या इंजिनिअर्सना सोडून इतर सर्व इंजिनिअर्सला (Funny memes on Engineers day) शुभेच्छा दिल्यात.

शहरातले भयंकर रस्ते बांधणाऱ्यांना सोडून…

औरंगाबाद शहरातील नागरिकांनीही महत्त्वाच्या रस्त्यांची कशी दुर्दशा झाली आहे, यावरील राग आज इंजिनिअर्स डे च्या निमित्ताने व्यक्त केला. शहरातील बाबा पेट्रोलपंप ते सिडको बसस्टँड पर्यंतचा रस्ता बांधणाऱ्या इंजिनिअरला सोडून इतर सर्वांना शुभेच्छा… असे संदेश आज व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुकवर फिरत आहेत. तसेच जळगाव रोडचे बांधकाम करणाऱ्या इंजिनिअरला सोडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

पुढे लै स्कोप है… दिनाच्या शुभेच्छा

असाही एक काळ होता, जेव्हा लहान मुलांना भविष्यात काय व्हायचं असं विचारल्यावर ते मला इंजिनिअर व्हायचं असं म्हणायचे. मात्र आता खुद्द इंजिनिअर्सनीदेखील आपल्या प्रोफेशनवरील होणारे विनोद हसतमुखाने घेण्याचं ठरवलेलं दिसतंय. इंजिनिअर्सनीदेखील त्यांच्या मनातील दुःख व्यक्त करताना, आपलं दुःख आपल्यालाच कळतं, तरीही.. दिनाच्या शुभेच्छा, तसेच पुढे लै स्कोप है… दिनाच्या शुभेच्छा अशा आशयाचे संदेश पाठवले आहेत.

विश्वेश्वरय्या यांचा आज जन्मदिन

भारतातील महान अभियंते, भारतरत्न मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस म्हणजेच 15 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. विश्वेश्वरय्या हे महान इंजिनिअर्सपैकी एक होते. भारताच्या रचनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या आदराप्रीत्यर्थ देशात हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा करतात. त्यांची आठवण काढत अनेकांनी आज सोशल मीडियावर देशभरातील अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या, पण या शुभेच्छांमधून काहीजणांना वगळले.

इतर बातम्या-

हेल्मेट न घातल्याने 22 पोलिसांना दंड, औरंगाबाद वाहतूक पोलिसांची कारवाई, हेल्मेटशिवाय आयुक्तालयात एंट्री नाही

बंद पडलेल्या फ्रिजमधून अवैध बायोडिझेल विक्री, औरंगाबाद गुन्हे शाखेचा छापा, 23 हजार 40 हजारांचा ऐवज जप्त

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI