औरंगाबाद मुंबई महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोन जणांचा मृत्यू

| Updated on: Aug 13, 2021 | 9:07 AM

औरंगाबाद मुंबई महामार्गावर भीषण अपघात झालाय. अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय. दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. एकाच दुचाकीवर तिघे जण औरंगाबाद मुंबई महामार्गावरुन प्रवास करत होते.

औरंगाबाद मुंबई महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोन जणांचा मृत्यू
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद मुंबई महामार्गावर भीषण अपघात झालाय. अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय. दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.

एकाच दुचाकीवर तिघे जण औरंगाबाद मुंबई महामार्गावरुन प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत तिन्ही तरुण गाडीवरुन खाली पडले. दुचाकीवरील तिघांपैकी दोघांचा मृत्यू झालाय.

मध्यरात्री एक वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेतल्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक गंभीर जखमी आहे. गणेश बाळू जाधव आणि नितीन अंबादास जाधव अशी मृतांची नावे आहेत.

औरंगाबादेत गुंडगिरी, उद्योजक राम भोगलेंच्या कंपनीत घुसून 10 ते 15 जणांची CEO ना मारहाण

औरंगाबाद शहरातील औद्याोगिक वसाहतींमध्ये दादागिरीचे प्रमाण वाढत आहे. औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांच्या भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मंगळवारी दहा ते पंधरा गुंडांनी प्रवेश केला. त्यानंतर कंपनीचे सीईओ असलेल्या नित्यानंद भोगले यांना मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

सीसीटीव्हीत दिसत असलेली ही गुंडगिरी औरंगाबाद शहरातील भोगले ऑटोमोटिव्ह कंपनीतील आहे. या कंपनीचे मालक राम भोगले यांचा औरंगाबादेतील औद्योगिक वसाहत वाढवण्यामध्ये मोठा वाटा आहे. आणि त्याच राम भोगले यांच्या भावाला हे गुंड मारहाण करत आहेत.

शहरातील रेल्वे स्टेशन जवळील भोगले अ‍ॅटोमोटिव्हीव्ह कंपनी मध्ये 10 ते 15 जणांचा जमाव घुसला आणि सरळ अधिकारी आणि कर्मचारी यांना मारहाण केली. औरंगाबादमध्ये हे असेच दादागिरीचे प्रकार वाढत असल्याने उद्योग बंद का करू नयेत, हा प्रश्न आता उद्योजकांना पडला आहे.

(Maharashtra Aurangabad unkwon vehicle hit a two-wheeler, death two youths)

हे ही वाचा :

CCTV VIDEO | औरंगाबादेत गुंडगिरी, उद्योजक राम भोगलेंच्या कंपनीत घुसून 10 ते 15 जणांची CEO ना मारहाण