PHOTO | महाशिवरात्री निमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

महाशिवरात्री निमित्त दुपारी चार वाजता मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत घृष्णेश्वर मंदिर ते शिवालय तीर्थ घृष्णेश्वर भगवानची पालखी मिरवणूक निघणार असून महाशिवरात्री निमित्त भाविकांना घृष्णेश्वर भगवानच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात प्रवेश देण्यात येणार आहे.

PHOTO | महाशिवरात्री निमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 2:34 PM

औंरगाबादः वेरूळ (Ellora) येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिरात (Ghrishneshwar Temple) महाशिवरात्री (Mahashivratri) उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. या लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर बाराही ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतल्याचं पुण्य लाभतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. मागील अडीच वर्षांपासून येथील गाभाऱ्याचं दर्शन बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे अडीच वर्षानंतर प्रथमच भाविकांना महादेवाचं दर्शन थेट गाभाऱ्यातून घेण्याची संधी मिळतेय. त्यामुळे भाविकांच्या मोठ्या रांगा इथे लागल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त येथे आठ दिवसीय यात्रेचं आयोजन केलं जातं. त्यामुळे पुढील आठवडाभर विविध शहरांतून भाविक येथे दर्शनासाठी येतील.

Ghrishneshwar Temple

महाशिवरात्रीनिमित्त महापूजा

मागील अडीच वर्षांपासून येथील गाभाऱ्याचं दर्शन बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे अडीच वर्षानंतर प्रथमच भाविकांना महादेवाचं दर्शन थेट गाभाऱ्यातून घेण्याची संधी मिळतेय. त्यामुळे भाविकांच्या मोठ्या रांगा इथे लागल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त येथे आठ दिवसीय यात्रेचं आयोजन केलं जातं. त्यामुळे पुढील आठवडाभर विविध शहरांतून भाविक येथे दर्शनासाठी येतील.

Ghrushneshwar Temple

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येची सजावट

Ghrishneshwar Temple

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येची सजावट

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

आजपासून येत्या काही दिवसात घृष्णेश्वर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होईल. या पार्श्वभूमीवर पोलीसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश चौगुले यांच्यासह खुलताबाद पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये एक डीवायएसपी , एक पोलीस निरीक्षक , 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक , 06 अधिकारी , 40 पोलीस अंमलदार , 51 होमगार्ड , एक दंगा काबू पथक , एक बॉम्ब शोधक व नाशक पथक यांचा समावेश आहे. तर देवस्थान ट्रस्टच्या बत्तीस सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे.

Ghrishneshwar Temple

दुपारी चार वाजता पालखी मिरवणूक

स्थानिक पत्रकाकर वैभव किरगत यांनी दिलेल्या माहितीनुसार,  महाशिवरात्री निमित्त दुपारी चार वाजता मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत घृष्णेश्वर मंदिर ते शिवालय तीर्थ घृष्णेश्वर भगवानची पालखी मिरवणूक निघणार असून महाशिवरात्री निमित्त भाविकांना घृष्णेश्वर भगवानच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात प्रवेश देण्यात येणार आहे. ही माहिती अध्यक्ष शशांक टोपरे व कार्यकारी विश्वस्त योगेश विटखेडे यांनी दिव्यमराठीशी बोलताना दिली . तसेच येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट सह संबंधित सर्व विभागा मार्फत सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत.

इतर बातम्या-

Russia Ukraine War: रशियन फौजांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं केविन पीटरसनचं कुटुंब

VIDEO : खारकीवमध्ये रशिया हवाई हल्ले करण्याची शक्यता-Russia Ukraine War

Non Stop LIVE Update
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.