आरक्षणाच्या लढाईमध्ये बंधुभावाची प्रेरणा, काकासाहेब शिंदे यांना MIM आदरांजली अर्पण करणार

आरक्षणाच्या लढाईमध्ये बंधुभावाची प्रेरणा, काकासाहेब शिंदे यांना MIM आदरांजली अर्पण करणार
काकासाहेब शिंदे यांचं स्मारक

गोदावरी नदीवरील काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकावर एमआयएम श्रद्धांजली वाहणार आहे.मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमकडून मराठा आरक्षणातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Dec 11, 2021 | 6:50 AM

औरंगाबाद: एमआयएमच्या (MIM) स्थापनेच्या निमित्तानं मुस्लीम (Muslim) आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या प्रश्नी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध जिल्ह्यातून मोर्चेकरी मुंबईत (Mumbai) दाखल होणार आहेत. औरंगाबाद शहरातून शेकडो वाहनांनी कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत. मुस्लीम आरक्षणासाठीच्या मोर्चा दरम्यान एमआयएमकडून काकासाहेब शिंदे यांना (Kakasaheb Shinde) श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. गोदावरी नदीवरील काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकावर एमआयएम श्रद्धांजली वाहणार आहे.मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमकडून मराठा आरक्षणातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणातील हुतात्म्यांना एमआयएम आदरांजली वाहणार

मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीसाठी एमआयएम मोर्चा काढण्यात येणार आहे. एमआयएमच्या वतीने काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचे कायगाव टोका इथे स्मारक आहे. गोदावरी नदीवरील काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकावर एमआयएम देणार श्रद्धांजली आहे. मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम मराठा आरक्षणातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे. 300 गाड्यांचा ताफा थांबवून एमआयएम काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली 300 गाड्यांचा ताफा थांबवून एमआयएम काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबई वर निघणार मोर्चा

मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीसाठी एमआयएम मोर्चा काढणार आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबईवर मोर्चा काढण्यात येणार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मोर्चाला सुरुवात होणार असून औरंगाबाद शहरातून शेकडो वाहनांनी कार्यकर्ते होणार मुंबईला रवाना होणार आहेत.

मोर्चाला परवानगी नाकारली

एमआयएमकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा मोर्चा काढण्यावर एमआयएम ठाम आहे. एमआयएमच्या मोर्चावर पोलीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.

इतर बातम्या:

Muslim reservation : मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईत धडकणार, उद्या मुंबईवर काढणार विराट मोर्चा

School: शाळा सुरु करण्याचा एकत्रित निर्णय 15 डिसेंबरला राज्यस्तरावर घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

MIM organize protest march today for Muslim Reservation will paid tribute to Kakasaheb Shinde martyr of Maratha Reservation

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें