औरंगाबादेत मनसे जारी करणार मराठवाड्याच्या विकासाची ब्लू प्रिंट, राज ठाकरेंच्या उपस्थितीत लवकरच पदाधिकाऱ्यांचा मेळावा

| Updated on: Sep 24, 2021 | 11:08 AM

औरंगाबाद: कोरोना आणि काही कायदेशीर पेचप्रसंगांत अडकलेली औरंगाबाद महापालिकेची निवडणूक (Aurangabad Municipal corporation Election) येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान मनसेनेही निवडणुकीसाठी बाह्या सरसावल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या सत्तेवर शिवसेना आहे. मात्र या परिसराचा विकास शिवसेनेला करता आला नाही. म्हणूनच मनसे आता मराठवाड्याच्या विकासाची ब्लू […]

औरंगाबादेत मनसे जारी करणार मराठवाड्याच्या विकासाची ब्लू प्रिंट, राज ठाकरेंच्या उपस्थितीत लवकरच पदाधिकाऱ्यांचा मेळावा
राज ठाकर
Follow us on

औरंगाबाद: कोरोना आणि काही कायदेशीर पेचप्रसंगांत अडकलेली औरंगाबाद महापालिकेची निवडणूक (Aurangabad Municipal corporation Election) येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान मनसेनेही निवडणुकीसाठी बाह्या सरसावल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या सत्तेवर शिवसेना आहे. मात्र या परिसराचा विकास शिवसेनेला करता आला नाही. म्हणूनच मनसे आता मराठवाड्याच्या विकासाची ब्लू प्रिंट (Blue Print for devloment) जारी करणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आजी-माजी-भावीच्या गप्पांनी दिशाभूल केली

मनसेच्या वतीने औरंगाबादेत गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्यासह सतनाम सिंग गुलाटी, गजन गौडा पाटील, संदीप कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात आजी-माजी-भावी असा उल्लेख करून जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे राजकारणाच्याच वावड्या उठल्या आणि खऱ्या विकासकामांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप दाशरथे यांनी यावेळी केला.

मनसे मराठवाड्याचे नंदनवन करणार- दाशरथे

1988 पासून शिवसेनेची शहरात सत्ता आहे. मात्र लोकांचा पाणी प्रश्न, कचरा प्रश्न आदी मूलभूत समस्या सोडवण्यात सेनेला अपयश आहे. पूर्वी लोकांना दररोज पाणी मिळत होते, आता तेही मिळत नाही. या पक्षाच्या कार्यकाळातच जिल्ह्यात टँकर लॉबी तयार झाली. आता औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्याचेच नंदनवन करण्याचा मनसेचा प्रयत्न असेल. यासाठी लवकरच मराठवाड्याची ब्लूप्रिंट तयार करण्यात येणार असल्याची माहिती दाशरथे यांनी दिली. या ब्लू प्रिंटच्या माध्यमातून शहराचा विकास कशा पद्धतीने केला जाईल, हेही दाखवले जाईल.

राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणार मेळावा

येत्या काही दिवसांत मराठवाडा पदाधिकाऱ्यांचा मेळावा शहरात होणार आहे. या मेळाव्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे शहरात येणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिली. राज ठाकरेंच्याच हस्ते मराठवाड्याच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक वॉर्डात उमेदवार देणार

आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व वॉर्डात उमेदवार देणार आहे. त्या दृष्टीने पक्षाने तयारीदेखील सुरु केल्याची माहिती मिळाली. मात्र निवडणुकीत भाजपशी युती होणार की नाही, याबाबतचा निर्णय राज ठाकरेंच्या आदेशानंतर होईल, त्यानुसारच मनसैनिक काम करतील, अशी माहितीही दाशरथे यांनी दिली.

मनसेचा एकही नगरसेवक नाही

2015 मध्ये झालेल्या मागील महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले होते. मात्र यावेळी सर्व वॉर्डांमध्ये मनसेचा उमेदवार उभा करण्याचा निश्चय पक्षाने केला आहे. दरम्यान औरंगाबाद महापालिकेतील पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे आहे.

– शिवसेना – 29
भाजप – 22
एमआयएम – 25
कॉंग्रेस – 10
राष्ट्रवादी – 03
बसप – 05
रिपब्लिकन पक्ष – 01
अपक्ष – 18
एकूण – 112

इतर बातम्या-

औरंगाबाद महापालिकेत आता तीन सदस्यीय प्रभाग रचना! तगड्या पक्षांचे फावणार, अपक्षांचा कस लागणार

लिचेडच्या पाण्याचे औरंगाबाद महापालिका करणार शुद्धीकरण, कचऱ्यापेक्षाही तिपटीने घातक लिचेड