
बीड (परळी): भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना आदरांजली वाहिली आहे. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली.गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर (Dinanath Hospital, Pune) रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर देशभरातील नेते, इतिहास प्रेमी आणि कलाकार व अभ्यासकांनी बाबासाहेबांच्या निधनाबद्दल विविध माध्यमांवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. परळी येथील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही बाबासाहेबांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कर्तृत्वाच्या आठवणी पंकजा मुंडे यांनी जाग्या केल्या. त्या म्हणाल्या, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम पुरंदरे यांनी नेहमीच केलं. त्यामुळे त्यांचं हे काम अखंड जिवंत राहील.’ बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अंबाजोगाई येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेवरही पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. मागील काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होतेय, त्यामुळे गृहमंत्रालयाने याची दखल घेत, असे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणीदेखील पंकडजा मुंडे यांनी यावेळी केली.
बीड जिल्हा पोलिस यंत्रणा सत्ताधाऱ्यांची प्रकरणं झाकण्यात व्यस्त, जनसामान्य रामभरोसे!
गंभीर, दुर्दैवी, निषेधार्ह आणि
लज्जास्पद ,किळसवाणा प्रकार ! @Pankajamunde @DrPritamMunde https://t.co/97qX7qRo8b— Pankaja Munde’s Office (@pmo_munde) November 12, 2021
अंबाजोगाई येथील मजूर कुटुंबातील मुलीच्या आईचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. आईच्या मृत्यूनंतर पीडितेच्या वडिलांनी तिचे लग्न लावून दिले. पीडित मुलगी लग्नानंतर सासरच्या छळाला कंटाळून माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर शहरात नोकरी शोधण्यासाठी गेल्यानंतर अंबाजोगाई येथील एका अकादमीत तिची दोन लोकांशी भेट झाली. नोकरी लावण्याच्या नावाखाली दोघांनी पीडितेवर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिच्यावर 400 हून अधिक वेळा बलात्कार झाला. पीडित मुलगी सध्या 20 आठवड्यांची गरोदर आहे. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
इतर बातम्या-