Aurangabad: औरंगाबादच्या नामांतरणाचा लढा न्यायालयात; जिल्ह्यातील तिघांकडून याचिका दाखल, एक ऑगस्टला सुनावणी

| Updated on: Jul 28, 2022 | 7:31 AM

औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतरणाचा लढा आता न्यायालयात पोहोचला आहे. आधी महाविकास आघाडी सरकारकडून आणि नंतर त्या निर्णयाला स्थगिती देत शिंदे सरकारकडून औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

Aurangabad: औरंगाबादच्या नामांतरणाचा लढा न्यायालयात; जिल्ह्यातील तिघांकडून याचिका दाखल, एक ऑगस्टला सुनावणी
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतरणाचा लढा आता न्यायालयात पोहोचला आहे. आधी महाविकास आघाडी सरकारकडून आणि नंतर त्या निर्णयाला स्थगिती देत शिंदे सरकारकडून औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला असून, औरंगाबाद जिल्ह्यातील तीन रहिवाशांनी औरंगाबादच्या नामांतरणाला विरोध केला आहे. त्यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचा दावा याचिकेत (Petition) करण्यात आला आहे. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. आता या याचिकेवर एक ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

एमआयएमचाही विरोध

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये मंजूर केला होता. तेव्हापासून एमआयएमकडून या निर्णयाला विरोध होत आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा एमआयएमच्या नेत्यांनी शिवसेनेसोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर देखील टीका केली आहे. तसेच प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर गुगल मॅपवर देखील औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे दाखवण्यात येत आहे. यावर देखील एमआयएमच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे.तर दुसरीकडे मात्र हिंदुत्ववादी संघटनांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

नेमक प्रकरण काय?

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे अशी मगणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. याच मुद्द्यावरून अनेकदा राजकारण तापले.अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. महाविकास आघाडी सरकारमधील इतर दोन घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील या निर्णयाला पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे, भाजपाचे सरकार आले. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. व पुन्हा एकदा औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून, त्यावर एक ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.