5

जलील यांच्याच घराखाली फायरिंग, चुकून निवडून आलेल्या खासदाराने शिकवू नये : चंद्रकांत खैरे

हवेत फिरवलेला पिस्तूल हा गाडीत बसलेल्या व्हीआयपी लोकांचा असेल,पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही" असे वक्तव्य माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. (pistol Chandrakant Khare)

जलील यांच्याच घराखाली फायरिंग, चुकून निवडून आलेल्या खासदाराने शिकवू नये : चंद्रकांत खैरे
इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 3:31 PM

औरंगाबाद : “सध्या राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं सरकार आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. हवेत फिरवलेला पिस्तूल हा गाडीत बसलेल्या व्हीआयपी लोकांची असेल,पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही” असे वक्तव्य माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. ते औरंगबादमध्ये ”टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. तसेच, औरंगाबादचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे चुकून निवडून आलेले आहेत. आता लोकांना पश्चात्ताप होत आहे. जलील हे दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही खैरे यांनी जलील यांच्यावर केला. (pistol that was aired may belongs  to VIP person that was present in car said Chandrakant Khare)

“सध्या राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं सरकार आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. हवेत फिरवलेला पिस्तूल हा गाडीत बसलेल्या व्हीआयपी लोकांचा असेल,पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही. आम्हाला राग येतो पण आम्ही शांत बसतो. हा माणूस चुकून निवडून आला. आता सगळे लोक पश्चात्ताप करतात. जलील दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात,” असे खैरे म्हणाले.

जलील यांचेच माणसं बंदूक चालवतात

इम्तियाज जलील यांनी ट्विटरवर टाकलेल्या व्हिडीओवरुन राज्यात खळबळ उडाल्यानंतर त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. हवेत फिरवलेली पिस्तूल ही गाडीत बसलेल्या व्हीआयपी व्यक्तीची असेल असे खैरे म्हणाले. तसेच, बंदूक कोणी कोणाला दाखवली नाही. ते सगळं चुकीचं आहे, असे खैरे म्हणाले. तसेच, जलील यांच्या घराच्या बाजूलाच गोळ्या झाडल्या जातात असेही खैरे म्हणाले. “दोन दिवसांपूर्वी जलील यांच्या घराच्या बाजूलाच बंदूक चालली. एका भंगारवाल्याने ही बंदूक चालवली. उद्वव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आमच्याकडे कोणीही दादागिरी करत नाही. बंडखोऱ्या, दगडफेक असले प्रकार आमच्याकडे होत नाहीत,” असे खैरै म्हणाले.

जलील यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये काय आहे?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रहदारीतून मार्ग काढताना काही शिवसैनिक हवेत पिस्तूल फिरवत असल्याचा आरोप जलील यांनी केला. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये शिवसेनेचा लोगो असलेल्या गाडीत दोन व्यक्ती बसल्या आहेत. त्या व्यक्ती पिस्तूल बाहेर काढून हवेत फिरवत असल्याचे दिसत आहे. या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यामुळे जलील यांनी गाडीवरचा लोगोच सगळं काही संगत असल्याचे म्हणत गाडीतील लोकांना शिवसैनिक म्हटलंय. तसेच पुणे-मुंबई द्रुतगीत मार्गावर काही शिवसैनिक हवेत पिस्तूल फिरवत रहदारीतून वाट काढण्यासाठी दादागिरी करत असल्याचंही जलील यांनी म्हटलंय. तसेच या प्रकाराची दखल गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

भर रस्त्यावर शिवसैनिकांची पिस्तूल दाखवून दादागिरी?, व्हिडीओ दाखवत इम्तियाज जलील यांची कारवाईची मागणी

(pistol that was aired may belongs  to VIP person that was present in car said Chandrakant Khare)

Non Stop LIVE Update
'नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते...', केंद्रीय मंत्र्यांनी संस्कृतीची आठवण
'नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते...', केंद्रीय मंत्र्यांनी संस्कृतीची आठवण
'चप्पल घालत याचं मार्केटिंग झालंय', पवार अन् सुप्रिया सुळेंवर निशाणा
'चप्पल घालत याचं मार्केटिंग झालंय', पवार अन् सुप्रिया सुळेंवर निशाणा
कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेकडून चोप, अविनाश जाधव म्हणाले,
कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेकडून चोप, अविनाश जाधव म्हणाले,
असं डोहाळे जेवण पाहिलंय का? ‘सुंदरी’च्या कार्यक्रमाची राज्यभरात चर्चा
असं डोहाळे जेवण पाहिलंय का? ‘सुंदरी’च्या कार्यक्रमाची राज्यभरात चर्चा
सहा महिन्यात मंत्री म्हणून फिरणार, ठाकरे गटाच्या नेत्याचे खळबळ माजवली
सहा महिन्यात मंत्री म्हणून फिरणार, ठाकरे गटाच्या नेत्याचे खळबळ माजवली
प्रकाश आंबेडकर यांची या नेत्यावर टीका, म्हणाले 'सावध व्हा, चप्पल...
प्रकाश आंबेडकर यांची या नेत्यावर टीका, म्हणाले 'सावध व्हा, चप्पल...
72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी साहित्य प्रेमींनी गजबजणार
72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी साहित्य प्रेमींनी गजबजणार
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...