भर रस्त्यावर शिवसैनिकांची पिस्तूल दाखवून दादागिरी?, व्हिडीओ दाखवत इम्तियाज जलील यांची कारवाईची मागणी

काही शिवसैनिकांनी वाहनांच्या रहदारीतून रस्ता काढण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिस्तूल दाखवल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. (Shivsainik revolver Pune Mumbai expressway)

भर रस्त्यावर शिवसैनिकांची पिस्तूल दाखवून दादागिरी?, व्हिडीओ दाखवत इम्तियाज जलील यांची कारवाईची मागणी
दोन व्यक्ती रस्त्यावर पिस्तूल दाखवत रस्ता काढताना.
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 12:05 PM

पुणे : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. काही शिवसैनिकांनी वाहनांच्या रहदारीतून मार्ग काढण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती (Pune Mumbai expressway) मार्गावर पिस्तूल दाखवल्याचा आरोप जलील यांनी केलाय. एका चारचाकी वाहनामधून समोरच्या व्यक्तीला पिस्तूल दाखवतानाचा व्हिडीओही त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच, गाडीवरचा शिवसेनेचा लोगोच सगळं काही सांगत असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा प्रकाराची दखल घेणार का?, असा सवालही जलील यांनी केला आहे. (two Shivsainik brandishing revolver on Pune Mumbai expressway)

एमआयएम आणि शिवसेना या दोन पक्षांमधील राजकीय वैर सर्वांना सर्वश्रूत आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी दोन्ही पक्षांमधील नेते दवडत नाहीत. खासदार इम्तियाज जलील यांनी एका व्हिडीओचा आधार घेत शिवसैनिक भर रस्त्यात पिस्तूल दाखवून मार्ग काढण्यासाठी दादागिरी करत असल्याचा आरोप केला आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

शिवसेनेचा लोगो असलेल्या गाडीत बसलेल्या दोन व्यक्ती पिस्तूल बाहेर काढून हवेत फिरवत असल्याचे दिसत आहे. या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यामुळे जलील यांनी गाडीवरचा लोगोच सगळं काही संगत असल्याचे म्हणत गाडीतील लोकांना शिवसैनिक म्हटलं आहे. तसेच  पुणे-मुंबई द्रुतगीत मार्गावर काही शिवसैनिक हवेत पिस्तूल फिरवत रहदारीतून वाट काढण्यासाठी दादागिरी करत असल्याचंही जलील यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकाराची दखल गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे. जलील यांनी हा व्हिडीओ अनिल देशमुख आणि मुंख्यमंत्री कार्यालयाला टॅग केला आहे.

दरम्यान, जलील यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यांनतर एकच खळबळ उडाली आहे. गाडीवर शिवसेनेचा लोगो असला तरी, पिस्तूल हवेत फिरवणाऱ्या दोन व्यक्ती शिवसेनेशी निगडित असल्याचे अजूनतरी समोर आलेले नाही.

संबंधित बातम्या :

हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप, इम्तियाज जलील यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : औरंगाबादमध्ये एमआयएमचा दबदबा, 65 जागांवर विजयी

राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला मशिदी उघडू, जलील यांचे अल्टिमेटम

(two Shivsainik brandishing revolver on Pune Mumbai expressway)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.