Raj Thackeray : राज ठाकरेंना अटक करण्याची तयारी, मनसे नेत्यांनी वर्तवली शक्यता, राजकारणाचा पारा चढला

राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा (Aurangabad Police) दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तर मनसेच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी नोटीसाही बजावल्या आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरेंना अटक करण्याची तयारी, मनसे नेत्यांनी वर्तवली शक्यता, राजकारणाचा पारा चढला
राज ठाकरे, मनसे अध्यक्षImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 3:22 PM

औरंगाबाद : राज्यात सध्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्यांच्या अटकेची शक्यता मनसे नेत्यांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे व्यक्ती कितीही मोठी असेना कायद्याने कारवाई होणार, असे सूचक विधान संजय राऊतांनी (Sanjay Raut) केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय होणार? राज ठाकरेंना अटक होणार का? तसेच पोलीस काय भूमिका घेणार? असे एक ना अनेक सवाल विचारण्यात येत आहेत. तर कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही म्हणाले आहेत. राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा (Aurangabad Police) दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तर मनसेच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी नोटीसाही बजावल्या आहेत.

राज ठाकरेंवर कोणत्या कलमांखाली गुन्हा

116, 117, 153 अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कलमांमध्ये राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना जामीन मिळू शकतो असेही कायदेतज्ज्ञ सांगत आहे. पोलिसांनी आणखी एखादं कलम लावल तर राज ठाकरेंना अटकही होऊ शकते, मात्र याबाब पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. तर दुसरीकडे मनसे नेतेही पोलिसांच्या टार्गेटवर आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांनी मनसेच्या 4 नेत्यांना चर्चेसाठी बोलवले असल्याची माहिती समोर आली आहे.  सायंकाळी 4 वाजता मुंबई पोलीस आयुक्त आणि मनसे नेत्यांची बैठक असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यांबाबत दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभुमिवर, नागपूरातील मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावलीय. शिवाय काही पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर पोलिसांची नजर आहे. असं असलं तरीही उद्या मनसे कार्यकर्ते करणार हनुमान चालीसा पठण आणि राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणार असं नागपूरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणनं आहे, त्यामुळे आता पोलीस हे प्रकरण कसं हाताळणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सरकारची भूमिका आहे की मनसेवर दबाव निर्माण करायचा. जेव्हा अटी टाकल्या होत्या तेव्हाच आम्हाला काळाल होतं. आम्ही घाबरत नाही संघर्ष करत राहणार. आम्ही कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढली आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. तर भोंग्यांसंदर्भात राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करु असेही देशपांडे म्हणाले आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.