औरंगाबाद शहरातील वृक्षांची होणार स्मार्ट गणना, लवकर मोबाइल अ‍ॅप विकसित होणार

| Updated on: Oct 22, 2021 | 5:45 PM

औरंगाबाद: शहरातील विविध भागातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी औरंगाबाद ट्री सेन्सस (Tree census) म्हणजेज एटीटी हे मोबाइल प विकसित केले जात आहे. दिवाळीनंतर लगेचच या झाडांच्या मोजणीला सुरुवात होणार आहे. पुढील 26 जानेवारीपर्यंत ही गणना पूर्ण केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. झाडगणनेविषयी बैठकीत चर्चा जलशिवार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, […]

औरंगाबाद शहरातील वृक्षांची होणार स्मार्ट गणना, लवकर मोबाइल अ‍ॅप विकसित होणार
Tree
Follow us on

औरंगाबाद: शहरातील विविध भागातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी औरंगाबाद ट्री सेन्सस (Tree census) म्हणजेज एटीटी हे मोबाइल प विकसित केले जात आहे. दिवाळीनंतर लगेचच या झाडांच्या मोजणीला सुरुवात होणार आहे. पुढील 26 जानेवारीपर्यंत ही गणना पूर्ण केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

झाडगणनेविषयी बैठकीत चर्चा

जलशिवार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन इत्यादी प्रकल्पात लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने विशेष मोबाइल अ‍ॅप्लीकेशन देण्यात आले होते. या अ‍ॅप्लिकेशन्सचा जिओ टॅगिंग डाटा अजूनही उपलब्ध आहे. म्हणून याच धर्तीवर वृक्षगणना करण्यासाठी एक मोबाइल अ‍ॅप्लीकेशन विकसित करावे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तसेच लोक सहभागातून वृक्षगणना करून घ्यावी, असे निर्देश महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले. गुरुवारी महापालिका, स्मार्ट सिटी आणि औरंगाबाद फर्स्ट यांची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पांडेय यांनी हा मुद्दा मांडला.

औरंगाबाद दर्शन बस सुरु करणार

शहरात मुंबई दर्शन बसच्या धर्तीवर औरंगाबाद दर्शन बस सेवा सुरु करण्याचाही विचार महापालिका प्रशासनाचा आहे. त्यासाठी चाचपणी सुरु असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी दिली. या सेवेसाठी स्मार्ट सिटीची मदत घेतली जाणार आहे. पर्यटनाला चालवना देण्यासाठी महापालिकेत पर्यटन विभाग आहे. या विभागाची जबाबदारी उपायुक्त सौरभ जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. उपायुक्त जोशी यांनी आता पर्यटन विभागाच्या माध्यमातून कोण कोणते उपक्रम राबवता येतील या अनुषंगाने चाचपणी सुरु केली आहे. मुंबई दर्शनच्या सुविधेप्रमाणे औरंगाबादमधील प्रेक्षणीय स्थळांसाठीही अशी सेवा करता येईल, असे प्रयत्न सुरु आहेत.

मनपात एक कोटींचा बोनस

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मनपातील 2,656 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना 3,500 रुपये सानुग्रह अनुदान तसेच अस्थायी व इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दिवाळी भेट देण्याचे आदेश प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी काढले. पुढील आठवड्यात ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली. महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला, वाढीव महागाई भत्तादेखील मिळत आहे. मात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि अस्थायी कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका, तासिका तत्त्वावरील शिक्षिका, आशा वर्कर्स यांना कोणतेही लाभ मिळत नाहीत. मनपात 2,593 चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. तसेच शिक्षण विभागातील 63 कर्मचारी आणि 602 अस्थायी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्यासाठी पांडेय यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 3500 रुपयांप्रमाणे 92 लाख 96 हजार रुपये आणि अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणे 12 लाख 4 हजार रुपये असा एकूण 1 कोटी 5 लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

इतर बातम्या-

100 कोटींच्या उत्सवात कुठेय औरंगाबाद ? जिल्ह्यात 20 टक्केच नागरिकांचे दोन डोस, जागे व्हा, लस घ्या!