AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert | थंडी पळाली समजू नका, पुढचे दोन दिवस तापमान घसरण्याची शक्यता, काय आहे हवामानाचा अंदाज?

उत्तरेकडील वाऱ्याचा जोर कमी होत आहे. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उत्तरेकडील वाऱ्यांचा परिणाम जाणवत असल्याने तेथे थंडी आहे. परंतु, पुढे दोन दिवसांत सर्वत्र किमान तापमानात संथ गतीने वाढ होणार आहे.

Weather Alert | थंडी पळाली समजू नका, पुढचे दोन दिवस तापमान घसरण्याची शक्यता, काय आहे हवामानाचा अंदाज?
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 09, 2022 | 9:48 AM
Share

औरंगाबादः औरंगाबादसह मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा (Cold wave decreased) जोर कमी झाला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस अनेक भागातील तापमानाचा पारा 10 अंशांपेक्षा खाली घसरला होता. मात्र सध्या किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर ओसरला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागतेय की काय असे चित्र आहे. मात्र पुढचे दोन दिवस मराठवाड्यातील (Weather in next 2 days) काही भागातील तापमान एक ते दोन अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी (Meterologist ) वर्तवली आहे. त्यानंतर किमान तापमानात हळू हळू वाढ होईल, मात्र 19 फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यताच वर्तवली जात आहे.

सध्या मराठवाड्यातील तापमान कसे?

औरंगाबाद- किमान 13.6, कमाल- 31.4 परभणी- किमान 14.0, कमाल- 32.6 नांदेड- किमान 19.0, कमाल- 32.6 बीड- किमान- 13.0, कमाल 29.0 उस्मानाबाद- किमान- 14.0, कमाल- 32.3 हिंगोली- किमान – 18.0, कमाल- 31.0

उत्तर मराठवाड्यात पारा घसरणार

सध्या किमान आणि कमाल तापमानात काहीशी वाढ झालेली असली तरीही पुढील दोन दिवस उत्तर मराठवाड्यात म्हणजे परभणी, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यात आहे. त्यानंतर किमान तापमानात हळू हळू 2 ते 4 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच विस्तारीत अंदाजानुसार (ERFS) मराठवाड्यात 13 ते 19 फेब्रुवारीदरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता, मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.

राज्याची सद्यस्थिती काय?

भारतीय हवामान शास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रत्र कृष्णानंद होसळीकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, रा्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे 10 अंश एवढे नोंद झाले असून मुंबईदेखील 17 अंशांच्या आसपास स्थिरावले आहे. राज्यातील किमान तापमानात पुन्हा एकदा किंचित घट होण्यास सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान थोडे खाली आहे. तर उत्तरेकडे थंडीचा प्रभाव अधिक आहे. विदर्भातही थंडीचा प्रभाव अधिक आहे.

भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ के. होसळीकर यांचे ट्विट-

काही ठिकाणीच थंडी का वाढणार?

दरम्यान, मराठवाड्यातल्या काही ठिकाणीच तापमानाचा पारा का घसरणार, असाही प्रश्न उपस्थित होतोय. तर उत्तरेकडील वाऱ्याचा जोर कमी होत आहे. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उत्तरेकडील वाऱ्यांचा परिणाम जाणवत असल्याने तेथे थंडी आहे. परंतु, पुढे दोन दिवसांत सर्वत्र किमान तापमानात संथ गतीने वाढ होणार आहे.

पिकांवर काय परिणाम ?

हिवाळा संपत आल्यामुळे हळू हळू तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे पिकांवर याचा फार परिणाम होणार नाही. मात्र काही ठिकाणी ज्वारीवर चिकटा किंवा खोड अळीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. तसेच पिकांवर कीड आणि इतर रोड पडणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी केले आहे.

इतर बातम्या-

‘…अन्यथा तुमचा Lalu Prasad Yadav करु’, सरकार पाडण्यात मदत करा, Sanjay Raut यांना धमकी

Nashik Election | कळवण, देवळा, निफाडचे नगराध्यक्ष बिनविरोध; 3 ठिकाणी चुरशीची लढत

Follow Us
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट