Nashik Election | कळवण, देवळा, निफाडचे नगराध्यक्ष बिनविरोध; 3 ठिकाणी चुरशीची लढत

दिंडोरी नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 3, पेठमध्ये 2 आणि सुरगाण्यात 2 अर्ज आले आहेत. या ठिकाणी कोणी अर्ज मागे घेणार की, निवडणूक होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Nashik Election | कळवण, देवळा, निफाडचे नगराध्यक्ष बिनविरोध; 3 ठिकाणी चुरशीची लढत
डावीकडून अनुक्रमे कौतिक पवार, रूपाली गंधवे आणि भारती आहेर.
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 10:20 AM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीपैकी (Nagar Panchayat) कळवण, देवळा, निफाडमध्ये नगराध्यक्ष बिनविरोध निवडला जाणार असून, उर्वरित 3 ठिकाणी मात्र चुरशीच्या लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी तीन ठिकाणी फक्त एकेक अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कौतिक पगार, निफाडमध्ये शहरविकास आघाडीच्या रूपाली गंधवे, देवळा येथे भाजपच्या भारती अशोक आहेर यांची निवड निश्चित मानली जातेय. मात्र, उर्वरित ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. दिंडोरी नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 3, पेठमध्ये 2 आणि सुरगाण्यात 2 अर्ज आले आहेत. या ठिकाणी कोणी अर्ज मागे घेणार की, निवडणूक होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सुरगाणा येथे शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे कोणाकडे हे पाहावे लागेल.

सुरगाण्यात कोण?

सुरगाणा नगरपंचायतीमध्ये एकूण 17 जागा आहेत. या ठिकाणी सर्वाधिक आठ जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेनेने सहा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा मिळवली आहे. देवळा येथेही भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. या ठिकाणी एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी 15 जागा भाजपने मिळवल्या आहेत, तर अवघ्या दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. एकंदर या दोन्ही नगरपंचायतीमध्ये भाजची सत्ता येण्याचा मार्ग अतिशय सुकर आहे.

दिंडोरीची उत्सुकता

दिंडोरीत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी 17 पैकी 6 जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस येथे एकत्र आले, तर सहजपणे महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. विशेष म्हणजे दिंडोरी हा डॉ. भारती पवार यांचा लोकसभा मतदार संघ असून, त्यांचे येथे मजबूत जाळे आहे.

महापालिकेचे वेध

जिल्ह्यात सध्या नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या निवडणुका येणाऱ्या काळात होणार आहेत. या ठिकाणी उमेदवारांनी आत्तापासूनच तयारी सुरू केलीय. प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर तर प्रचाराला वेग आलाय. येणाऱ्या काळात यात रंगत येणार असून, या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

इतर बातम्याः

भोगी विषयांचा सोहळा; घोरपडीचे गुप्तांग, साळिंदराच्या काट्याची पूजा भांडारात विक्री, राज्यव्यापी कनेक्शन

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.