AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र हादरला… लोक बघत होते,रिक्षाचालकाने चिमुकल्याच्या पायाला पकडून कपडे धुवावे तसे गरगर फिरवून…; मुलाचं काय झालं?

महाराष्ट्र हादरला... लोक बघत होते, विकृत रिक्षाचालकाने चिमुकल्याच्या पायाला पकडून कपडे धुवावे तसे गरगर फिरवून...; मुलाच्या प्रकृतीबद्दल धक्कादायक अपडेट समोर

महाराष्ट्र हादरला... लोक बघत होते,रिक्षाचालकाने चिमुकल्याच्या पायाला पकडून कपडे धुवावे तसे गरगर फिरवून...; मुलाचं काय झालं?
Crime
| Edited By: | Updated on: Mar 31, 2026 | 2:49 PM
Share

लहान मुलांना आपण प्रचंड प्रेमाने, लाडात सांभाळतो… आपल्या बाळाला काहीही होऊ नये यासाठी आई – वडील स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि मुलांचा व्यवस्थित सांभाळ करतात. पण अनेक ठिकाणी मुलांना बेदम मारहाण होत असल्याचं चित्र देखील अनेक ठिकाणी दिसतं. अशीच घटना नुकताच घडली आहे. एका रिक्षाचालकाने चिमुकल्याच्या पायाला पकडलं… त्याला जमिनीवर आपटलं आणि पुव्हा त्याच्या बिल्डिंगमध्ये नेत मारल्याची घटना वसई येथे घडली आहे… यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ माजली आहे… तर जाणून घ्या रिक्षाचालकाने मुलासोबत नक्की काय केलं.

एका रिक्षाचालकाने चक्क साडे तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या पायाला पकडून कपडे धुवावे त्याप्रमाणे फिरवून आपटून मारलं आहे. रिक्षावाल्याच्या विकृतीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून, सीसीटीव्ही पाहिल्यानंतर प्रत्येकाचा थरकाप उडत आहे…

वसई पश्चिम कोर्टा जवळील अनुपम घर संकुल सोसायटीत रात्री जवळपास 8 वा. च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. संदीप पवार असं विकृत रिक्षाचालकाचं नाव असून, हा याच सोसायटीतील बी विंग मधील रहिवाशी आहे. चिमुकल्याचा वडिलांचा राग असल्यामुळे त्याने मुलाला मारल्याची माहिती समोर येत आहे.

मुलाबद्दल सांगायचं झालं तर, विघ्नेश कोंडारे असं जखमी साडे तीन वर्षांच्या चिमुरड्याचं नाव आहे. सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या चिमुकल्याला रिक्षाचालकाने रिक्षातून बाहेर काढलं. त्याने मुलाच्या पायाला पकडलं आणि त्याला जमिनीवर आपटलं.. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याला मिरारोड व्होकार्ट हॉस्पिटल मध्ये दाखल केले असून, चिमुरड्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. घडलेल्या घटनेने विकृत रिक्षाचालका विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पीडित मुलाच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, संदीप पवार रिक्षाचालक त्याच परिसरात राहतो. त्याने रिक्षात बसलेल्या मुलाला बाहेर काढून जमिनीवर एकदा आपटलं आणि तेथून फरफट नेवून त्याच्या विंगमध्ये नेल्यानंतर देखील त्याला मारलं. त्यामुळे मुलगा गंभीर जखमी आहे. सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याने दोन वेळा रक्ताची उल्टी देखील केली आहे. पण डॉक्टरांनी त्याला दाखल करुन घेतलं नाही, अखेर मीरारोड येथील व्होकार्ट रुग्णालयात मुलावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती चिंताजनक असून 24 तास त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तर मुलगा सध्या व्हेंटिलेटरवर असून ICU मध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी