AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayush Komkar Murder : बंडू आंदेकरवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, पुणे पोलीस नानापेठमध्ये पोहोचले अन् थेट…

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी पुण्यात आयुष कोमकर या तरुणाची हत्या करण्यात आली होती, आता या प्रकरणातील आरोपी असलेल्या बंडू आंदेकर याच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Ayush Komkar Murder : बंडू आंदेकरवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, पुणे पोलीस नानापेठमध्ये पोहोचले अन् थेट...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2025 | 2:50 PM
Share

पुण्यात काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर या तरुणाची हत्या करण्यात आली, पार्किंमध्येच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, या घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पाच सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली.  दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीमधील अनेकांना अटक केलं आहे.

गेल्या वर्षी पुण्यात वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, गणेश कोमकर याच्यावर वनराज आंदेकर यांच्या हत्येचा आरोप आहे. सध्या गणेश कोमकर हा जेलमध्ये आहे. तर ज्याची आता हत्या झाली तो आयुष कोमकर हा गणेश कोमकर याचा मुलगा आहे. आपल्या मुलाच्या हत्येचा बदल घेण्यासाठीच बंडू आंदेकर याने आपल्याच नातवाची लेकीच्या मुलाची आयुष याची हत्या घडवून आणल्याचा  आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात सध्या तो अटकेत आहे.

दरम्यान आता पोलिसांनी बंडू आंदेकर आणि आंदेकर टोळीवर मोठी कारवाई केली आहे. आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामावर पुणे पोलिसांनी हातोडा चालवला आहे. पुण्याच्या नाना पेठ परिसरात  असलेली आंदेकर टोळीची अवैध बांधकामं पाडायला सुरुवात झाली आहे. पुणे महापालिका आणि पोलिसांची नानापेठमध्ये संयुक्त कारवाई सुरू आहे. बांधकामासोबत आंदेकर टोळीचे अनधिकृत फ्लेक्स देखील पोलिसांनी पाडले आहेत, एवढंच नाही तर    माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचं स्मृतिस्थळ असलेली पाणपोई देखील गॅस कटरच्या मदतीनं काढण्यास सुरुवात झाली आहे.

27 बँक खाती गोठवली 

दरम्यान काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणात आंदेकर टोळीची तब्बल 27 बँक खाती गोठवली आहेत. बंडू आंदेकर याच्या संपत्तीचा शोध सुरू असतानाच या बँक खात्याची माहिती समोर आली होती, आता ही खाती पोलिसांनी गोठवली आहेत. तर दुसरीकडे आंदेकर टोळी आणि बंडू आंदेकर याच्या अवैध बांधकामावर देखील पुणे पोलिसांनी हातोडा चालवला आहे. महापालिका आणि पुणे पोलिसांकडून ही कारवाई सुरू आहे, नानापेठेमधील अवैध बांधकाम पाडण्यात येत आहे.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.