AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील लाऊडस्पीकर बंदीनंतर ‘अजान अ‍ॅप’ लाँच, मशिदींच्या नोंदणीला सुरूवात

मुंबईत मशि‍दींवरील लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे आता अजान अ‍ॅप्लिकेशन लाँच करण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबईतील अर्धा डझन मशि‍दींनी या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर नोंदणी केली आहे.

मुंबईतील लाऊडस्पीकर बंदीनंतर 'अजान अ‍ॅप' लाँच, मशिदींच्या नोंदणीला सुरूवात
Azan AppImage Credit source: Meta AI
| Updated on: Jul 01, 2025 | 5:46 PM
Share

मुंबईत ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मशि‍दींवरील लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे आता अजान अ‍ॅप्लिकेशन लाँच करण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबईतील अर्धा डझन मशि‍दींनी या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर नोंदणी केली आहे. यामुळे नमाज करणाऱ्यांना अजानची वेळ समजनार आहे. यामुळे ध्वनी प्रदूशनाला आळा बसणार आहे. ऑनलाइन अजान नावाचे हे अ‍ॅप्लिकेशन तामिळनाडूच्या एका कंपनीने तयार केले आहे.

माहीम जुमा मशिदीचे विश्वस्त फहाद खलील पठाण यांनी याबाबत बोलताना सांगितले की, अजानसाठी लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध आहेत. लाऊडस्पीकर वापरल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता हे इल अ‍ॅप स्थानिक मशिदींमधून थेट नमाज पठण करणाऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यास मदत करते. या मोफत अ‍ॅपमुळे घरी अजान ऐकण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

अझान अ‍ॅप कोणी तयार केले?

अजान हे अ‍ॅप तामिळनाडूतील आयटी व्यावसायिकांच्या टीमने तयार केले आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयफोनवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप मशिदीतून अजान सुरु होते, तेव्हा मोबाईल फोनवर अजानचा लाईव्ह ऑडिओ स्ट्रीम प्ले करते. लाऊडस्पीकरवरील बंदीमुळे अजान ऐकू न शकणाऱ्या लोकांसाठी हे अ‍ॅप फायदेशीर ठरणार आहे.

अझान अ‍ॅप कसे काम करते?

अजान अ‍ॅप युजर्सला नमाजच्या वेळेबद्दल माहिती देते, एकदा इंस्टॉल केल्यानंतर ते ऑटोमॅटिक चालते. त्यामुळे नमाज ऐकणाऱ्यांनी सांगितले की, ‘लाऊडस्पीकर बंद असतानाही, आम्ही आता मोबाइल फोनद्वारे शेजारच्या मशिदीच्या अजानचा आवाज ऐकू शकतो.

माहीम जुमा मशिदीचे विश्वस्त फहद खलील पठाण म्हणाले, ‘आम्ही लाऊडस्पीकरवर बंदी घातल्यानंतर संघर्षाऐवजी हा नवोपक्रम निवडला. आता लाऊडस्पीकर नसतानाही लोक अजान ऐकू शकतात.गेल्या तीन दिवसांतच आमच्या मशिदीभोवती राहणाऱ्या 500 लोकांनी या अ‍ॅपवर नोंदणी केली आहे. तसेच मुंबईतील एकूण सहा मशिदींनी अ‍ॅपच्या सर्व्हरवर नोंदणी केली आहे.’

ऑनलाइन अजान हे अ‍ॅप बनवणाऱ्यांपैकी एक मोहम्मद अली यांनी सांगितले की, ‘अ‍ॅप विकसित करणारी कंपनी तीन वर्षे जुनी आहे आणि तामिळनाडूमध्ये 250 मशिदी यावर रजिस्टर आहेत. यावर रजिस्टर करण्यासाठी एका फॉर्म भरून द्यावा लागतो, तसेच मशिदीचा पत्ता पुरावा आणि अजान देणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड द्यावे लागते. यानंतर मशिद रजिस्टर होते.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.